कोठूनही करता येणार तक्रार; मग घरातूनच करा ई-एफआयआर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 12:45 PM2024-09-07T12:45:25+5:302024-09-07T12:46:08+5:30

जर्मनी मध्ये नोकरीची संधी शेकडो तक्रारी दाखल : सिटिझन पोर्टलमुळे घरबसल्या सुविधा

Complaints can be made from anywhere; Then file e-FIR from home | कोठूनही करता येणार तक्रार; मग घरातूनच करा ई-एफआयआर

Complaints can be made from anywhere; Then file e-FIR from home

लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती :
पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदविण्याची प्रतिक्रिया अतिशय किचकट आहे. अनेक जण येथे जाण्याचे टाळतात. त्यासाठी काही लोकं गंभीर प्रकार झाला, तरी तक्रार नोंदवत नव्हते. आता हा त्रास कमी झाला आहे. आता घरबसल्या ई- तक्रार दाखल करता येते. याची पोलिसांना दखल घ्यावी लागते.


कोठूनही कोणत्याही पोलिस ठाण्यात, अशी तक्रार देण्याची सुविधा सिटीझन पोर्टल व अमरावती ग्रामीण व शहर पोलिसांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शहर पोलिसांनी दुचाकी चोरी, मोबाइल चोरीबाबत तक्रारी नोंदविण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ई-तक्रारींची पोलिसांकडून दखल घेतली जाते. त्या पोलिस ठाण्याच्या लॉगइनवर ती तक्रार वरिष्ठांनाही दिसते. त्यामुळे तक्रारींवर कारवाई करावीच लागते.


काय आहे ई- एफआयआर ? 
सिटिझन पोर्टलवर आपले अकाउंट तयार करावे. लॉगइन आयडी, पासवर्ड दिल्यानंतर हे अकाउंट तयार होते. यावरून तक्रार करता येते. तो एफआयआर पोलिसांना दिसतो.


तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सोपी 
तक्रार दाखल झाल्यानंतर तपास अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार संबंधित ठाण्यात उपस्थित राहावे लागते. ई- तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे.


तक्रार कशी नोंदवाल? 
सीसीटीएनएस प्रणालीअंतर्गत अनेक सुविधा नागरिकांनाही मिळत आहेत. याअंतर्गतच ई-एफआयआर दाखल केला जातो. त्यासाठी सिटिझन पोर्टलचा वापर करावा लागतो.


तक्रारीसाठी काय आवश्यक? 
ई-एफआयआर दाखल करण्यासाठी सिटीझन पोर्टलवर अकाउंट क्रिएट करणे आवश्यक आहे. त्यानंतरच तक्रार देता येते. त्यासाठी अधिकृत मोबाइल क्रमांक जोडावा लागतो.


नागरिकांच्या सुविधेसाठी सेवा 
ई-तक्रार ही सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचा अधिकाधिक वापर करणे अपेक्षित आहे. यामुळे वेळेची बचत होणार आहे व प्रक्रियेला गती येईल.


पोलिस खात्री करणार 
सिटीझन पोर्टलवरून आलेल्या तक्रारींची पोलिसांकडून खात्री केली जाते. यासाठी तक्रारदाराने परिपूर्ण माहिती भरूनच तक्रार करणे अपेक्षित आहे. खरी माहिती भरणे अनिवार्य आहे.


पोलिस अधिकारी काय म्हणाले? 
"ई-एफआयआर ही पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची इलेक्ट्रॉनिक पद्धत आहे. याचा अर्थ ती ऑनलाइन दाखल करता येते. याच्या मदतीने कोणताही नागरिक ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे कुठूनही पोलिसांकडे तक्रार करू शकतो. पोलिस सेवा अधिक सुलभ आणि प्रभावी बनवणे हा ई-एफआयआरचा मुख्य उद्देश आहे." 
- किरण वानखडे, प्रमुख, स्थानिक गुन्हे शाखा
 

Web Title: Complaints can be made from anywhere; Then file e-FIR from home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.