स्वस्त धान्य दुकानदारांनी केली आमदारांकडे तक्रार
By admin | Published: March 7, 2016 12:09 AM2016-03-07T00:09:26+5:302016-03-07T00:09:26+5:30
ठेकेदारांकडून धान्य स्वस्त धान्य दुकानदारांना गोदामातील धान्य साठा वेळेवर मिळत नसल्याने अनेक स्वस्त धान्य दुकानदारांची गैरसोय होते.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : धान्य कोटा वेळेवर मिळतच नाही
अमरावती : ठेकेदारांकडून धान्य स्वस्त धान्य दुकानदारांना गोदामातील धान्य साठा वेळेवर मिळत नसल्याने अनेक स्वस्त धान्य दुकानदारांची गैरसोय होते. यासंदर्भात अमरावतीचे आ.सुनील देशमुख यांच्याकडे अमरावती स्वस्त धान्य दुकानदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली आहे.
अमरावती शहरामध्ये १६५ स्वस्त धान्य दुकान आहेत. काही वर्षापूर्वी शासनाद्वारे पोच योजना सुरू करण्यात आली. या योजनेद्वारे दुकानदारांना दुकानापर्यंत धान्य पोहचविणार व काही पैसे द्यावे लागणार नाही, असे स्वस्त धान्य दुकानदारांना सांगण्यात आले होते. त्यांनी योजना हिताची आहे म्हणून स्वीकारही केला होता. परंतू प्रत्यक्षामध्ये दुकानात धान्य ठेवताना २४ रूपये क्विंटल मागे रक्कम द्यावी लागते. त्यामुळे दुकानदारांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. १२ रुपये गोदामातून व १२ रुपये दुकानातून घ्यावे लागते हा प्रकार बंद करण्यात यावा.
तसेच गोदामातून रेशनचे धान्य ठेकेदारांकडून पूर्ण एकाच वेळी प्राप्त होत नाही. धान्य पोहचविण्यात दिरंगाई होते. तसेच रेशनचे धान्य कमी वजनाचे येते.
आश्रमशाळेचे आस्थापना कार्डचे धान्य दोन-दोन महिने मिळत नाही. तसेच धान्य गोदाममधून ठेकेदारांच्या जी. पी. एस. सिस्टीम लावण्यात यावी, ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे शासकीय धान्याचा पुरवठा उशीरा करण्यात येतो. अमरावती स्वस्त धान्य दुकानदार संघाचे कार्याध्यक्ष कोमल बोथरा, उपाध्यक्ष छोटेलाल केशरवाणी, सचिव भारत सरवैय्या आदींनी तक्रार केली आहे. (प्रतिनिधी)