शहरातील कामे तातडीने पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 11:13 PM2018-01-06T23:13:18+5:302018-01-06T23:14:11+5:30

शहरात होत असलेले काँक्रीट रस्ते, उड्डाणपूल, भुयारी गटार योजना व जीवन प्राधिकरणाची पाईप लाईन, आयपीडीएस अंतर्गत विद्युत केबल अंडरग्राऊंड करणे ....

Complete the city's work promptly | शहरातील कामे तातडीने पूर्ण करा

शहरातील कामे तातडीने पूर्ण करा

Next
ठळक मुद्देअधिकाऱ्यांना सूचना : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात बैठक

आॅनलाईन लोकमत
अमरावती : शहरात होत असलेले काँक्रीट रस्ते, उड्डाणपूल, भुयारी गटार योजना व जीवन प्राधिकरणाची पाईप लाईन, आयपीडीएस अंतर्गत विद्युत केबल अंडरग्राऊंड करणे आणि इतर अनेक मंजूर व प्रस्तावित कामे करताना संबधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकत्रित बसून समन्वयाने कामे करा व ज्या कामांसाठी निधी आहे, ती कामे जलतगतीने पूर्ण करा, अशा सूचना आ. सुनील देशमुख यांनी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांसह इतर विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंत्याच्या सभागृहात शनिवारी दुपारी २ वाजता सदर बैठक पार पडली. यावेळी पंचवटी ते इर्विन चौकापर्यंत करण्यात आलेल्या काँक्रीटीकरणाच्या कामांचे योग्य नियोजन न झाल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. लोकांना यामुळे त्रास सहन करावा लागला. पण, आता इर्र्विनपासून तर राजापेठपर्यंत दुसऱ्या टप्प्यात करण्यात येत असलेले काँक्रीटीकरण मुख्य चौकातून करण्यात येणार असल्याने नियोजनबद्ध काम करणे गरजचे राहणार आहे. वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची दखल घ्यावी लागेल तसेच भुयारी गटार योजना, अंडरग्रऊंड केबल टाकण्याच्या कामांचे सर्व अधिकाºयांनी एकत्रित बसून नियोजन करावे व कामे त्वरीत पुर्ण करावे. पोलिसांनाही वाहतुकीसंदर्भात योग्य ती खबरदारी घेऊन लोकांना अडचण निर्माण होणार नाही, अशीे व्यवस्था करण्याची सूचना यावेळी आ. सुनील देशमुख यांनी केली. यावेळी शहरातील उड्डाणपूल व इतर विकासात्मक कामांचा आढावाही आ. देशमुख यांनी घेतला. यावेळी जी चर्चा झाली, त्या चर्चेचे मिनिट्स लिहिले गेले.
बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक साळवे, कार्यकारी अभियंता सदानंद शेंडगे, उपअभियंता सुहास शिरभाते, मिलिंद पाटणकर, महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता जीवन सदार, वाहतूक पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे, महावितरणचे कार्यकारी अभियंता (प्रशासन) दिलीप मोहड, कार्यकारी अभियंता (शहर) सौरभ माळी , विद्युत व बांधकाम प्रशासन उपअभियंता पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्या श्वेता बॅनर्जी तसेच रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी तसेच संबधित शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता व ज्या कंत्रादाराला कामे मिळाली आहेत, ते स्वत: वा त्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
शिवाजी महाविद्यालयासमोरील रस्ता मार्चनंतर
मार्च-एप्रिलमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा आटोपल्यानंतर श्री शिवाजी महाविद्यालयासमोरील दुसºया बाजूच्या काँक्रीटीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात येईल, अशी ग्वाही सदर कंत्राटदाराने आ. देशमुख व अधीक्षक अभियंत्यांना दिली. त्यामुळे दुसऱ्या बाजूच्या रस्त्याकरिता तीन महिने वाट पाहावी लागणार आहे. त्याआधी काही आठवड्यात पंचवटी ते इर्र्विन रस्ता वाहतुकीसाठी खुला करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
वलगाव रस्त्यावरील झाडांची दखल घ्या
नवसारी ते चांगापूर फाट्यापर्यंत रस्त्याचे चौपदरीकरण करताना ५० ते ६० वर्षांपूर्वीची अनेक मोठी झाडे लोकांच्या डोळ्यांदेखत जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळे प्रशासनावर लोकांची नाराजी असून, नवीन लावण्यात आलेल्या वृक्षांची जोपासना केली पाहिजे. याची खबरदारी संबधित कंत्राटदाराने व अधिकाºयांनी घ्यावी तसेच झाडे जगवावीत, अशा सूचनाही आ. सुनील देशमुख यांनी केल्या.

Web Title: Complete the city's work promptly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.