वर्धा नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:16 AM2021-07-14T04:16:25+5:302021-07-14T04:16:25+5:30

राजुरा बाजार : वर्धा जिल्ह्यातील शेती कसण्यासाठी निंभार्णी ते सिरसोली या गावांना जोडणारा वर्धा नदीवरील पूल नसल्याने १५० ते ...

Complete the construction of the bridge over the river Wardha | वर्धा नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण करा

वर्धा नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण करा

Next

राजुरा बाजार : वर्धा जिल्ह्यातील शेती कसण्यासाठी निंभार्णी ते सिरसोली या गावांना जोडणारा वर्धा नदीवरील पूल नसल्याने १५० ते २५० एकर शेती पडीक राहू शकते. २००८ पासून ग्रामस्थ याबाबत मागणी करीत आहेत.

आशिष वाघ, शरद चव्हाण, भैया वाघ, बबन वाघ, मनीष पाथरे, अंकुश पानबुडे, गोपाल कुरवाडे यांच्यासह ग्रामस्थांनी १३ वर्षांपासून पाठपुरावा केला. पालकमंत्री यशोमती ठाकूर, आमदार देवेंद्र भुयार, खासदार रामदास तडस, आमदार अमर काळे, आमदार दादाराव केचे यांनासुद्धा निवेदन दिले. पण, अद्याप निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे नागरिकांना हेलपाटे घेत शेत गाठावे लागते.

--------------

माजी पोलीस पाटील असल्याने २००७ पासून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला. व्हीएनआयटीने मोजमाप केले, पण निधी मिळाला नाही. या विषयात पुढील महिन्यात आंदोलन करणार आहोत.

- आशिष वाघ, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, आष्टी (शहीद)

------------------

दोन्ही जिल्ह्यातील आमदारांकडे, मंत्रालयात चकरा घालत आहोत. परंतु याकडे कोणत्याच नेत्याचे लक्ष नाही. त्यामुळे वर्धा नदीपात्रात आंदोलन करणार आहोत.

- शरद चव्हाण, शेतकरी, सिरसोली (आष्टी शहीद)

Web Title: Complete the construction of the bridge over the river Wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.