सीमोल्लंघनापूर्वी हवी संपूर्ण कर्जमुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 11:25 PM2017-09-11T23:25:22+5:302017-09-11T23:25:52+5:30
सततची नापिकी, आणि अस्मानी संकटाने गारद झालेल्या शेतकºयांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी,....
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सततची नापिकी, आणि अस्मानी संकटाने गारद झालेल्या शेतकºयांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, यामागणीसाठी सोमवारी शिवसेनेने जिल्हाकचेरीवर हल्लाबोल केला. जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन देऊन दसºयापूर्वी अन्नदात्याला कर्जमुक्त न केल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला.
खा. आनंदराव अडसूळ यांच्या नेतृत्वात स्थानिक इर्विन चौक ते कलेक्ट्रेट दरम्यान शेतकरी कर्जमुक्तीच्या प्रमुख मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. यामोर्चात जिल्हाभरातून शेतकºयांसह शिवसैनिकांचा मोठा सहभाग होता. २४ जून २०१७ रोजी शासनाने कर्जमुक्तीची घोषणा केली. मात्र, कर्जमुक्तीचा केवळ ‘फार्स’ झाला आहे. कागदोपत्री कर्जमुक्तीचा देखावा करण्यात आल्याचा आरोप खा. आनंदराव अडसूळ यांनी यावेळी केला. भाजप सरकार शेतकºयांची बोळवण करीत असून कर्जमुक्तीसाठी तांत्रिक निकष पूर्ण करताना शेतकºयांचा अक्षरश: अंत पाहिला जात असल्याचा आरोपही करण्यात आला. खरीप हंगाम शेतकºयांच्या हातून गेला किमान रबी हंगामासाठी शेतकºयांना दिलासा मिळावा, यासाठी दसºयापूर्वीच त्यांना कर्जमुक्त करणे गरजेचे आहे, अशी मागणी निवेदनातून जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना करण्यात आली.
कर्जमुक्तीचा फास, सेनेचा आरोप
मोर्चादरम्यान शासनविरोधी नारेबाजी करण्यात आली. मोर्चात खा. अडसूळ यांच्यासह जिल्हाप्रमुख संजय बंड, नगरसेवक प्रशांत वानखडे, राजेश वानखडे, सुनील खराटे, शोभा लोखंडे, वर्षा भोयर, मनीषा टेंभरे, पराग गुडधे, प्रकाश मारोटकर, ललीत झंझाड, बाळासाहेब राणे, किशोर माहोरे, शाम देशमुख, प्रवीण अब्रुक, विकास येवले, दयाराम सोनी, गोपाळ राणे, नरेंद्र पडोळे, आशिष धर्माळे, प्रदीप गौरखेडे, नाना नागमोते, अमोल निस्ताने, नीलेश जामठे, बंडू साऊत, विनोद डहाके, राजू निंबर्ते, बाबा ठाकूर, सुभाष मुळे, गोपाल अरबट, कपिल देशमुख, टिल्लू तिवारी, अर्चना धामणे, महेश खारोळे, दत्ता ढोमणे, दीपक मदनेकर, सुनील राऊत, राहुल माटोडेसह पदाधिकारी उपस्थित होते.