रमाई आवास, प्रधानमंत्री आवास योजनेतील घराचे प्रलंबित काम पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:16 AM2021-04-30T04:16:53+5:302021-04-30T04:16:53+5:30
बडनेरा : महापालिका क्षेत्रातील रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास घटक योजना क्रमांक ३ अंतर्गत घरांची प्रलंबित कामे त्वरित ...
बडनेरा : महापालिका क्षेत्रातील रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास घटक योजना क्रमांक ३ अंतर्गत घरांची प्रलंबित कामे त्वरित करून नागरिकांना दिलासा द्यावा, या आशयाचे निवदेन नगरसेवक प्रकाश बनसोड, ललित झंडाड यांनी महापालिका आयुक्तांना गुरुवारी दिले.
आयुक्त प्रशांत रोडे यांना दिलेल्या निवेदनानुसार, प्रधानमंत्री आवास योजनेची कामे गॅनान डकर्ले प्रा. लि. कंपनीने सब कंत्राटदार नेमून इतरांना काम दिले आहे. निविदा प्रकियेतील अटी-शर्तीनुसार हा करारनाम्याचा भंग झाला आहे. निविदेतील अटी, शर्तीनुसार संबंधित एजन्सीवर कारवाई करून प्रलंबित घरांची कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी बनसोड, झंझाड यांनी केली आहे.
रमाई आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी सहा महिन्यांपूर्वी प्रसिद्धी करून हरकती बोलावल्यानंतर ही यादी मंजूर करण्यात आली. लाभार्थी महापालिकेत घरकुलासाठी येरझारा मारत आहेत. कोविड-१९ च्या काळात नागरिकांना व्यवस्थित माहिती मिळत नाही. कोरोनाचे दिवस असताना रमाई आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांचे घरकुलाचे बांधकाम सुरू झाले नाही. पावसाळ्यापूर्वी घरकुलांचे निर्माण कार्य सुरू होईल, असा निर्णय प्रशासनाने घ्यावा, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.