१५ सप्टेंबरपूर्वी प्रक्रिया पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:33 AM2017-08-31T00:33:01+5:302017-08-31T00:33:22+5:30

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पीक कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया जिल्ह्यात ई- सेवा केंद्रांद्वारा सुरू आहे.

 Complete the process before 15th September | १५ सप्टेंबरपूर्वी प्रक्रिया पूर्ण करा

१५ सप्टेंबरपूर्वी प्रक्रिया पूर्ण करा

Next
ठळक मुद्देपालकमंत्री : कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज

अमरावती : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पीक कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया जिल्ह्यात ई- सेवा केंद्रांद्वारा सुरू आहे. यासंदर्भात शहरातील काही सेतू केंद्रांची पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी पाहणी केली. १५ सप्टेंबरच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश केंद्रचालकांना व यंत्रणेला दिले.
जिल्ह्यात किमान ६०० केंद्रांवर शेतकºयांच्या कर्जमाफी संदर्भातील आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.या प्रक्रियेला गती देण्यासाठी तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहायक, गटसचिव व संबंधित केंद्रचालक यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून कर्जमाफीचे अर्ज भरून घेण्याचे निर्देश देण्यात आले. या योजनेच्या अंंलबजावणीसाठी सर्व केंद्रचालकांचे प्रशिक्षण यापूर्वी पार पडले आहे. सर्व केंद्रांना माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाकडून बायोमेट्रिक यंत्रणा व इतर साहित्य उपलब्ध करण्यात आल्याचे अप्पर जिल्हाधिकारी के.पी.परदेशी यांनी सांगितले. यावेळी एसडीओ, तहसीलदार आदी उपस्थित होते.

Web Title:  Complete the process before 15th September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.