गांधीजींच्या भेटीला ८५ वर्षे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 10:33 PM2018-11-17T22:33:03+5:302018-11-17T22:33:20+5:30
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी भेट दिल्याच्या घटनेला १६ नोव्हेंबरला ८५ वर्षे पूर्ण झाली. हे औचित्य साधून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित ‘महाराष्ट्र आणि गांधीजी’ हा ग्रंथ संस्थेचे सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांना उपसंचालक राधाकृष्ण मुळी यांच्या हस्ते भेट देण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी भेट दिल्याच्या घटनेला १६ नोव्हेंबरला ८५ वर्षे पूर्ण झाली. हे औचित्य साधून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित ‘महाराष्ट्र आणि गांधीजी’ हा ग्रंथ संस्थेचे सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांना उपसंचालक राधाकृष्ण मुळी यांच्या हस्ते भेट देण्यात आला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मंडळाला १९३३ मध्ये भेट दिली त्यावेळी मंडळातील विद्यार्थ्यांनी शारीरिक खेळ व नगर संरक्षक दलातील हरिजन पलटणीने कवायती केल्या होत्या. मंडळाच्या स्वयंसेवकांनी गांधीजींच्या विविध कार्यक्रमांतील गर्दीचे नियंत्रण केले होते, असे प्रभाकरराव वैद्य म्हणाले. जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार यावेळी उपस्थित होते.