कंपोस्ट डेपो? छे ! कचºयाचा डोंगरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 11:31 PM2017-10-03T23:31:11+5:302017-10-03T23:31:25+5:30
आठ लाख लोकसंख्येच्या अंबानगरीतील हजारो टन कचरा वर्षानुवर्षे नजीकच्या सुुकळी येथील कंपोस्ट डेपोत ‘डम्प’ करण्यात येत असल्याने तेथील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.
अमरावती : आठ लाख लोकसंख्येच्या अंबानगरीतील हजारो टन कचरा वर्षानुवर्षे नजीकच्या सुुकळी येथील कंपोस्ट डेपोत ‘डम्प’ करण्यात येत असल्याने तेथील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. सुकळी गावाचे आरोग्य या कंपोस्ट डेपोमुळे धोक्यात आले आहे. त्यासाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची उभारणी अत्यंत निकडीची आहे.
या कंपोस्ट डेपोत सुमारे ७ ते ८ लाख टन कचरा विनाप्रक्रिया पडला असून त्यात शहरातून निघणाºया दैनंदिन २०० टन कचºयाची भर पडत आहे. येथे कचरा साठविण्याची मर्यादा १०-१२ वर्षांपूर्वीच संपुष्टात आली असून आता त्याठिकाणी कचरा साठविण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने कचरा समस्येचा स्फोट होण्याची भीती आहे.
महापालिका अस्तिवात येण्यापूर्वीच कचरा शहराबाहेर साठविण्यासाठी सुकळी येथील जागेचे आरक्षण कंपोस्ट डेपोसाठी करण्यात आले. तूर्तास या ठिकाणची ९.३८ हेक्टर जागा महापालिकेच्या ताब्यात आहे. नगरपालिकेच्या काळापासून सुकळी येथे महापालिका हद्दीतून दैनंदिन निघणारा घनकचरा साठविला जातो. त्या घनकचºयावर कुठलीही प्रक्रिया होत नसल्याने तेथे डोंगरसदृष्य परिस्थिती आहे. शहरात अन्य ठिकाणी कंपोस्ट डेपोचे आरक्षण असताना तेथे कचरा साठवणूक होत नसल्याने सुकळीत ७ ते ८ लाख टन कचरा साठविण्यात आल्याने हा प्रकल्प केव्हाचाच ओव्हरफ्लो झाला आहे. कचरा टाकण्यासाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने या भागातील ‘डीपी रोडलाही कचºयाने कवेत घेतले आहे. दुसरीकडे कचºयाचा डोंगर साचल्याने सुकळीसह लसनापूर ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळ्यात या भागाची परिस्थिती हाताबाहेर जाते. नेहमीप्रमाणे याही पावसाळ्यात कचरा डेपोत कचरा डम्प करण्यासाठी साधा पोकलॅण्ड देण्याची सवड प्रशासनाला मिळाली नाही. कचºयाचा ५० ते ६० फूट उंचीचा थर लागल्याने कचरा वाहतूकदारांचे ट्रक कचºयाच्या डोंगरावर चढविणे शक्य नाही. त्यामुळे येत्या काही महिन्यांत येथील कचरा समस्येचा स्फोट झाल्यास आश्चर्य वाटू नये, अशी विद्यमान स्थिती आहे.
तो प्रकल्प बंदच
सुकळी येथील कंपोस्ट डेपो ओव्हरफ्लो झाला. कचºयातील प्लास्टिकवर प्रक्रिया करणारा प्रकल्प गाजावाजा करुन उभारण्यात आला. महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडे प्लास्टिक प्रोसेसिंग युनिटचे कार्यान्वयन होते. मात्र या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे उदासीन धोरण व त्यात महावितरणने घातलेला खोडा या प्रकल्पाच्या मुळावर उठला. २ आॅक्टोबर २०१६ ला उद्घाटन झालेला हा प्रकल्प वर्षभरापासून बंद आहे. त्यामुळे कंपोस्ट डेपोतील कचरा समस्या अधिक ज्वलंत झाली आहे.