कृषि उत्पन्न बाजार समितीला मिळाले संगणकीकृत लिलाव भवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 09:59 PM2018-03-03T21:59:26+5:302018-03-03T21:59:26+5:30

स्थानिक कृषिउत्पन्न बाजार समितीत संगणकीकृत ई-लिलाव भवनाचे उद्घाटन काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले.

Computerized auctioned building got agricultural income market committee | कृषि उत्पन्न बाजार समितीला मिळाले संगणकीकृत लिलाव भवन

कृषि उत्पन्न बाजार समितीला मिळाले संगणकीकृत लिलाव भवन

Next
ठळक मुद्देइंटरनेट जोडणी : बबलू देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन

आॅनलाईन लोकमत
चांदूर बाजार : स्थानिक कृषिउत्पन्न बाजार समितीत संगणकीकृत ई-लिलाव भवनाचे उद्घाटन काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. इंटरनेट जोडणीने सुसज्ज यंत्रणेमुळे घरबसल्या बाजारभावाची माहिती मिळणार आहे.
उद्घाटन सोहळ्याला बाजार समिती सभापती प्रवीण वाघमारे, उपसभापती कांतीलाल सावरकर, माजी उपसभापती अरविंद लंगोटे, अमोल लंगोटे, भैयासाहेब लंगोटे, किशोर देशमुख, विकास सोनार, खरेदी-विक्री उपाध्यक्ष दादासाहेब आसरकर तसेच बाजार समितीमधील संचालक मंडळ आणि सचिव मनीष भारंबे उपस्थित होते. चांदूर बाजार कृषिउत्पन्न बाजार समितीतील ई-लिलाव भवनामुळे आता धान्याचे बाजारभाव व आवक याविषयी तालुक्यातील शेतकºयांना आपल्या मोबाइलवर घरबसल्या माहिती मिळेल. या भवनामध्ये एकूण १० कम्प्यूूटर लावले आहेत. समिती ही पूर्णपणे इंटरनेटशी जोडली जाणार आहे.

Web Title: Computerized auctioned building got agricultural income market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.