व्याघ्र संरक्षणाबाबत ‘एनटीसीए’त चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 01:02 PM2019-02-01T13:02:59+5:302019-02-01T13:04:36+5:30
देशात अडीच ते तीन हजार वाघ असून, व्याघ्र प्रकल्पाबाहेर ३० ते ३५ टक्के वाघ आहेत. यातून मानव-वन्यजीव संघर्ष, शिकारी, अवयवांची तस्करी, व्याघ्रांचा संचार मार्ग आदी समस्यांविषयी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) चिंता व्यक्त केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : देशात अडीच ते तीन हजार वाघ असून, व्याघ्र प्रकल्पाबाहेर ३० ते ३५ टक्के वाघ आहेत. यातून मानव-वन्यजीव संघर्ष, शिकारी, अवयवांची तस्करी, व्याघ्रांचा संचार मार्ग आदी समस्यांविषयी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) चिंता व्यक्त केली आहे. भारतातील जंगलाच्या तुलनेत १० ते १५ हजार वाघांचे सहजतेने संवर्धन होऊ शकते, असा अभ्यासपूर्ण आढावा सादर करण्यात आला आहे.
एनटीसीएच्या पुढाकाराने दिल्ली येथे २८ व २९ जानेवारी रोजी व्याघ्र संवर्धन करणाऱ्या १२ आशियाई देशाच्या प्रतिनिधींची तिसरी स्कॉक टेकींग परिषद घेण्यात आली. या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय वने व पर्यावरणमंत्री हर्षवर्धन यांच्या हस्ते करण्यात आले. थायलंड, कोलंबिया, व्हिएतनाम, रशिया, इंडोनेशिया, भूतान, कंबोडीया, मलेशिया, मॅनमार्क, लायोस, नेपाळ व भारत देशाचे प्रतिनिधी परिषदेत सहभागी झाले होते. यात व्याघ्र अभ्यासक विलास कारंभ, राजेश गोपाल, वाय. झाला यांनी देशातील वाघ संवर्धनाविषयी ंिचंता वर्तविल केली. महाराष्ट्रातून पेंच व्याघ्र प्रकल्पातून रामाराव, रवि गोवेकर, सह्यांद्रीचे गुजर यांची उपस्थिती होती. चीन वगळता अन्य १२ आशियाई देशाचे प्रतिनिधींनी सन- २०२० पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याविषयी मते वजा आढावा सादर केला. जगातील एकूण वाघांपैकी ५७ टक्के वाघ एकट्या भारतात आहेत. त्यामुळे भारताला 'व्याघ्रभूमी' असे संबोधले जाते. मात्र, अलीक डे वाघांचे संरक्षण, संवर्धनाचा विषय ऐरणीवर आला आहे. व्याघ्र प्रकल्पाबाहेर वाघांचे संचार चिंताजनक असल्याची बाब या परिषदेत मांडली गेली. भारतात वाघांच्या संख्येनुसार वन्यजीवांचे व्यवस्थापन योग्यप्रकारे होत नाही. देशात सन २०१४ मध्ये २,२६६ वाघांची संख्या होती. आता ती अडीच ते तीन हजांरांवर पोहचली आहे. व्याघ्रांचे संवर्धन, संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी वन्यजीव व्यवस्थापन महत्वाचे असल्याबाबतचे मत परिषदेतून मांडल्या गेले. चीनमध्ये वाघ अवयांची तस्करी होत असल्याची बाब अन्य आशियाई देशांच्या प्रतिनिधींनी मांडली आहे.
व्याघ्रांच्या संवर्धनाविषयी परिषदेत या मुद्द्यावर मंथन
- व्याघ्रांचे संचार मार्ग धोकादायक
- मानव -वन्यजीव संघर्ष टाळण्याबाबत उपाययोजना
- व्याघ्र अवयवांची तस्करी रोखणे
- शिकाऱ्यांवर अंकुश मिळविणे
- वन्यजीव व्यवस्थापन कृती आराखडा तयार करणे
- व्याघ्र प्रकल्पाबाहेरील वाघांचे संरक्षण
व्याघ्रभूमी अशी भारताची ओळख आहे. मात्र, वाघांचे मृत्यू, शिकारी, अवयवांची तस्करी या घटनांमध्ये वाढ होत आहे. भारत वगळता अन्य आशियाई देशांनी सन २०२० पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचा मानस केला आहे. देशात वन्यजीव व्यवस्थापनात उणिवा आहेत.
- यादव तरटे पाटील,
वन्यजीव अभ्यासक, अमरावती