सावंगी, मुसळखेडा शिवारातील संत्रा उत्पादकांमध्ये चिंतेचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 09:42 PM2021-02-17T21:42:22+5:302021-02-17T21:44:25+5:30

Amravati News : वरूड तालुक्यात गारपीट, गहू, चण्याचे नुकसान

Concerns among orange growers in Sawangi, Musalkheda Shivara | सावंगी, मुसळखेडा शिवारातील संत्रा उत्पादकांमध्ये चिंतेचे सावट

सावंगी, मुसळखेडा शिवारातील संत्रा उत्पादकांमध्ये चिंतेचे सावट

Next
ठळक मुद्देवरूड तालुक्यात १६ फेब्रुवारीपासूनच ढगाळ वातावरण होते.

वरूड (अमरावती) : तालुक्यात ढगाळी वातावरणासह काही भागांमध्ये अवकाळी पाऊस आला. सावंगी, मुसळखेडा शेतशिवारात गारपिटी झाली. यामध्ये मृग बहराच्या संत्र्यासह गहू, चण्याचे नुकसान झाले. शिवारात दिवसभर ढगाळी वातावरण असल्याने शेतक०यांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे.
वरूड तालुक्यात १६ फेब्रुवारीपासूनच ढगाळ वातावरण होते. बुधवारी पहाटे ३ पासूनच अवकाळी पावसाने सुरुवात केली. सावंगी, जामठी, मुसळखेडा परिसरात बोराएवढी गारपीट झाल्याने काही प्रमाणात नुकसान झाले.तालुक्यात सकाळी आणखी काही गावांमध्ये पाऊस कोसळला. गारपिटीमुळे संत्रा उत्पादक शेतक०यांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे.

Web Title: Concerns among orange growers in Sawangi, Musalkheda Shivara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.