शिक्षक परिषदेतर्फे अविरत रुग्णसेवेची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:09 AM2021-06-29T04:09:46+5:302021-06-29T04:09:46+5:30
सांगता सोहळ्याला डॉ. दयाराम भिलावेकार, डॉ. फुलचंद जामकर, डॉ. धनंजय पाटीलसह ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाचे आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. यावेळी ...
सांगता सोहळ्याला डॉ. दयाराम भिलावेकार, डॉ. फुलचंद जामकर, डॉ. धनंजय पाटीलसह ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाचे आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. यावेळी शिक्षक परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश चौकसे यांनी उपक्रमाबाबत माहिती दिली. सध्या कोरोना रुग्ण अगदी नगण्य असल्याने तसेच शिक्षक परिषदेने लसीकरणाबाबत जनजागृती करण्याचे कार्य हाती घेतले असल्याने तसेच २८ तारखेपासून शाळा सुरू होत असल्याने फळवाटप कार्यक्रमाची सांगता करीत असल्याचे त्यांनी जाहीर केले. भविष्यात आवश्यक त्या वेळी शिक्षक परिषद पुन्हा हजर होईल, अशी ग्वाही कार्याध्यक्ष संजय गंगराडे यांनी केले.
मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागात लसीकरणाकरिता लोकांना जागरूक करण्याचे काम फार अवघड आहे. लवकरच शिक्षक परिषद जनजागृती करणार असल्याचे आवाहन शिक्षक परिषदेचे विभागीय कार्यालयीन मंत्री प्रभुदास बिसंदरे यांनी केले. यावेळी शिक्षक परिषदेचे विभागीय कार्यालयीन मंत्री प्रभुदास बिसंदरे, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश चौकसे, तालुकाध्यक्ष रवि घवळे, कार्याध्यक्ष संजय गंगराडे, कार्यवाह प्रशांत रोहणकर, उपाध्यक्ष उमेश पटोरकर, राधेश्याम बिलमोरे, संघटनमंत्री रवि मालवीय, कार्यालय मंत्री गुरुदेवसिंह टिब, कोषाध्यक्ष राजेश खाडे, सहसंघटक प्रशांत सावलकर, सहकार्यवाह आनंद धांडे, सल्लागार गोविंद फुलमाळी, सदस्य उमेश आकोडे, अतुल गडेकर उपस्थित होते.