आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांप्रति सहवेदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:13 AM2021-03-24T04:13:18+5:302021-03-24T04:13:18+5:30
वरुड : यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी साहेबराव करपे यांनी १९ मार्च रोजी कर्जबाजारीपणाला कंटाळून सहपरिवार जीवन संपविले होते. त्यांच्याप्रती ...
वरुड : यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी साहेबराव करपे यांनी १९ मार्च रोजी कर्जबाजारीपणाला कंटाळून सहपरिवार जीवन संपविले होते. त्यांच्याप्रती सहवेदना व्यक्त करण्याकरिता विविध संघटनांनी महात्मा ज्योतीराव फुले आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास हारार्पण करून अन्नत्याग केला. यावेळी यावेळी गिरीश कराळे, नीळकंठ यावलकर, आशिष लोहे, नितीन ठाकरे, उमेश बंड, मनोज भोर, मनोज गेडाम, चंदू अडलक, शरद राऊत, देवेंद्र विधळे, अमोल कोहळे, रामा खोडे, राहुल चौधरी, संजय बहुरूपी, राहुल बरडे, उमेश निंभोरकर, जयंत भोपत, मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, समाज प्रबोधन मंच, सत्यशोधक फाउंडेशन, किसानपुत्र आंदोलन, वरुड व्यापारी संघ, रंगरावजी कराळे स्मृती प्रतिष्ठान पोरगव्हान, वरुड तालुका मुख्याध्यापक संघ, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना सहभागी झाले होते.