मेळघाटात आराेग्य जनजागृतीसाठी माेहीम राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:15 AM2021-06-09T04:15:11+5:302021-06-09T04:15:11+5:30
अमरावती : मेळघाटात कूप्रथा, अघोरी उपचार, कुपाेषणासह आरोग्याची काळजी घेण्यासाठी आदिवासींमध्ये जनजागृती मोहिम राबवावी, अशी मागणी युवा स्वाभिमानने सोमवारी ...
अमरावती : मेळघाटात कूप्रथा, अघोरी उपचार, कुपाेषणासह आरोग्याची काळजी घेण्यासाठी आदिवासींमध्ये जनजागृती मोहिम राबवावी, अशी मागणी युवा स्वाभिमानने सोमवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदनातून केली आहे.
चिखलदरा तालुक्यातील खटकली राजरत्न चमूनकर या बालकाला पोटावर चटके दिल्यामुळे प्राण गमवावे लागले, अश्या घटना भविष्यात घडू नये, यासाठी शासन व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने जनजागृती करून भविष्यात अश्या घटना घडू नये, यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात खासदार नवनीत राणा यांचे निर्देशानुसार युवा स्वाभिमान पार्टीच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
याआधीही अश्या घटना मेळघाटात घडल्या आहे. भविष्यात अश्या घटना घडू नये, यासाठी शासनाने आता कठोर पाऊल उचलणे गरजेचे आहे. आदिवासींच्या अंधश्रद्धा दूर करून त्यांना वैद्यकीय उपचारांचे महत्व पटावे व त्यांनी अघोरी उपाययोजना न करता उपलब्ध वैद्यकीय सुविधांचा लाभ घ्यावा, यासाठी त्यांना जागृत करण्यासाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आपण आपले स्तरावर योग्य त्या उपाययोजना कराव्या अशी विनंती युवा स्वाभिमान जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, कार्यालयीन सचिव उमेश ढोणे, मेळघाट विभागीय संपर्क प्रमुख उपेन बछले, देवेंद्र टीब, दुर्योधन जावरकर, राजेश वर्मा, मनीष मालवीय, मुकेश मालवीय, वर्षा जैस्वाल, बिलाल टेलको,शिवाजी केंद्रे,सुनील बिलवे,अर्जुन पवार,राम हेकडे, प्रमोद शनवारे,मंगेश कोकाटे,सुधीर लवनकर,आकाश राजगुरे,अजय बोबडे आदी उपस्थित होते.