नव्वदीनंतरही वृद्धांमध्ये आत्मविश्वास दांडगा; १४३०४ कोरोनावीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:15 AM2021-06-09T04:15:15+5:302021-06-09T04:15:15+5:30

संक्रमणाला न घाबरता केली मात, सकारात्मक विचारांनी जिंकण्याचे दाखविले बळ अमरावती : ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी हा अजार ...

Confidence in the elderly even after ninety; 14304 Coronavir | नव्वदीनंतरही वृद्धांमध्ये आत्मविश्वास दांडगा; १४३०४ कोरोनावीर

नव्वदीनंतरही वृद्धांमध्ये आत्मविश्वास दांडगा; १४३०४ कोरोनावीर

Next

संक्रमणाला न घाबरता केली मात, सकारात्मक विचारांनी जिंकण्याचे दाखविले बळ

अमरावती : ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी हा अजार अतिशय धोकादायक असल्याचे बोलले जात होते. मात्र, जगण्याची जिद्द असेल, तर कोरोनावर ८०-९० व्या वर्षीसुद्धा मात करता येते, हे अनेक रुग्णांनी दाखवून दिले आहे. जिल्ह्यात अशा १४ हजार ३०४ रुग्णांनी कोरोनावर मात केली.

जिल्ह्यात आजवर ९४ हजार २८९ लोक कोरोनाबाधित झाले आहेत. त्यात दिलासादायक बाब म्हणजे, ८९ हजार ५९९ लोकांनी कोरोनावर मात केली. १५०६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, मात्र जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण समाधानकारक आहे.

बॉक्स

५१ ते ८० वयोगटात सर्वाधिक मृत्यू

*जिल्ह्यामध्ये ५१ ते ८० वर्षे वयोगटातील नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे.

* ५१ ते ६० वयोगटात पहिल्या लाटेत १८९ मृत्यू, तर दुसऱ्या लाटेत १८१ मृत्यूची नोंद आहे.

* ६१ ते ७० वयोगटात पहिल्या लाटेत २८०, तर दुसऱ्या लाटेत १४४ जण दगावले.

* ७१ ते ८० वयोगटात पहिल्या लाटेत १३७, तर दुसऱ्या लाटेत १२६ जण मरण पावले.

* तथापि, बरे होऊन घरी परतलेल्या नागरिकांनी सकारातत्मक विचारांनी कोरोनाला हरवता येते हे दाखवून दिले आहे.

कोट

आम्हाला कोणी हरवू शकत नाही

- मी १५ दिवस कोविड सेंटरमध्ये उपचार घेतला. तिथल्या लोकांनी घरासारखे वागवले, सांभाळले आणि बरे करून पाठवले. डॉक्टर, सगळे लोक काळजी घेतात आणि उपचार देतात. म्हणून पेशंट बरे होऊन जातात.

- शरदराव कुळकर्णी (७६), अमरावती

- आधीच अर्धांगवायू, त्यात कोरोना सेंटरमध्ये गेलो तेव्हा श्वास भरून येत होता. मात्र, तब्बल २० दिवस कोरोना सेंटरमध्ये उपचार घेतल्यानंतर आता बरा झालो आहे. आता धाप लागत नाही आणि चालताही येते. सेंटरवर जागीच जेवायला दिले. मुले घेणार नाहीत एवढी काळजी घेतली. मला श्रमजिवी कोविड सेंटरमुळे जीवनदान मिळाले, माझी बहीण निर्मला हीदेखील इथेच बरी झाली.

-श्रीरंग मानकर (८२), अमरावती

----------------

८० पेक्षा जास्त वयाचे एकूण पॉझिटिव्ह - १५ हजार ५०२

बरे झालेल्या ज्येष्ठ रुग्णांची संख्या १४ हजार ६६७

कोरोनावर मात करण्यासाठी सकारात्मक विचार खूपच फायदेशीर आणि जगण्याची जिद्द महत्त्वाची ठरत आहे.

--------------

बॉक्स

अशी आहे आकडेवारी

पॉझिटिव्ह ९४२८९ - १४६६७

बळी ३६३ -१५०६

Web Title: Confidence in the elderly even after ninety; 14304 Coronavir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.