तंटामुक्त समित्या कागदावरच

By admin | Published: February 26, 2016 12:27 AM2016-02-26T00:27:29+5:302016-02-26T00:27:29+5:30

गावातील शांतता, सुव्यवस्था कायम राहून सौदार्याचे वातावरण राहावे व गावातील लहानसहान तंट्याचा गावातच निपटारा.

Conflicting Committees on Paper | तंटामुक्त समित्या कागदावरच

तंटामुक्त समित्या कागदावरच

Next

गावपातळीवरचे चित्र : थेट पोलीस ठाण्यांतच जातात तंटे, गुन्ह्यांचीही होते नोंद
अमरावती : गावातील शांतता, सुव्यवस्था कायम राहून सौदार्याचे वातावरण राहावे व गावातील लहानसहान तंट्याचा गावातच निपटारा. होऊन नागरिकांना पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागू नये म्हणून शासनाने प्रत्येक गावात तंटामुक्त समित्या गठित करण्यात आल्या हल्ली अनेक गावात लहानमोठ्या कारणावरुन निर्माण होणाऱ्या वादाच्या तक्रारी गावात न मिटता थेट पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा नोंदविला जात असल्याने शासनाच्या मूळ उद्देशालाच बगल दिला जात आहे. त्यामुळे तंटामुक्त समित्या कागदावरच अस्तित्वात असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.
गावपातळीवर सर्व समाज घटकांनी गुण्यागोविंदाने राहावे, आपसातील तंटे, गाव पातळीवरच निपटारा करुन गावात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी व यामधून गावाची एकात्मिता कायम राहून गावाचा विकास साधला जावा, यासाठी शासनव्दारा प्रत्येक गावात महात्मा गांधी तंटामुक्ती राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत गावातील तंटे गावातच मिटवून सर्व धार्मिक उत्सव शांततेत पार पाडणाऱ्या गावांना लोकसंख्येनुसार बक्षीस दिले जाते. सुरुवातीला या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक वर्षांपासून न्यायप्रविष्ट असणारी प्रकरणे सामोपचाराने मिटवून निकाली काढण्यात आली. अनेक गावांना तंटामुक्ती संदर्भात बक्षीस मिळाले. मात्र अलिकडच्या काळात एक दोन वर्षात तंटामुक्त समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडीत गावपातळीवर राजकारण घुसले, सक्षम नेतृत्व मिळाले नाही, पोलिसांचे देखील वेळोवेळी मार्गदर्शन नाही, यामुळे या समित्या कागदोपत्रीच अस्तित्वात असल्याचे दिसून येते.
अगदी लहानसहान तक्रारी पोलीस ठाण्यापर्यंत जात असून गुन्हे नोंदविल्या जात आहे. पोलिसांनाही आर्थिक लाभ होत असल्याने वाद मिटविल्यापेक्षा गुन्हे नोंदविल्या जात असल्याचा आरोप होत आहे. यामुळे अनेक प्रकरणांचे पर्यावरण मोठ्या बखेड्यामध्ये झाल्याची कित्येक उदाहरणे पोलिसांनीदेखील सकारात्मक भूमिका घेतल्यास गावपातळीवर हे अभियान यशस्वी होऊ शकते. तसेच भविष्यात वाद निर्माण होऊ नये यासाठी स्थानिक तंटामुक्ती समित्यांनीदेखील सक्रीयतेने कार्यान्वित राहण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Conflicting Committees on Paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.