वाहिन्या निवडीत केबल ग्राहकांमध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 10:08 PM2019-02-12T22:08:14+5:302019-02-12T22:09:04+5:30

आपल्या आवडीच्या वाहिन्या निवडणाऱ्या केबल ग्राहकांना पूर्वीपेक्षा भाडे महागात पडत असतानाच वाहिन्या निवडीतही संभ्रम निर्माण झालेला आहे. पे चॅनल पॅकेज निवडावे की स्वंतत्र चॅनल, याचाच गुंता सुटत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांनी केबल आॅपरेटरच्या घरी व कार्यालयात चकरा घालणे सुरू झाले आहे.

Confusion among cable customers in selecting channels | वाहिन्या निवडीत केबल ग्राहकांमध्ये संभ्रम

वाहिन्या निवडीत केबल ग्राहकांमध्ये संभ्रम

googlenewsNext
ठळक मुद्देकेबल आॅपरेटरांच्या घरी चकरा : पूर्वीच्या दरापेक्षा भाडे महाग

वैभव बाबरेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आपल्या आवडीच्या वाहिन्या निवडणाऱ्या केबल ग्राहकांना पूर्वीपेक्षा भाडे महागात पडत असतानाच वाहिन्या निवडीतही संभ्रम निर्माण झालेला आहे. पे चॅनल पॅकेज निवडावे की स्वंतत्र चॅनल, याचाच गुंता सुटत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांनी केबल आॅपरेटरच्या घरी व कार्यालयात चकरा घालणे सुरू झाले आहे.
टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया (ट्राय) ने आवडीच्या वाहिन्या घेण्याची संधी ग्राहकांनी दिली असून, १ फेबु्रवारीपासून ट्रायच्या नियमावलींची अंमलबजावणी केबल आॅपरेटरांनी सुरू केली आहे. केबल आॅपरेटर ग्राहकांकडून अर्ज भरून घेत आहेत. त्यांना त्यांच्या आवडीनिवडीच्या वाहिन्या देत आहेत. केबल ग्राहकांना १३० रुपयांत ‘फ्री टू एअर’ वाहिन्या घेणे अनिवार्य असून, याव्यतिरिक्त पे चॅनलचे अतिरिक्त पैसे द्यावे लागत आहेत. याशिवाय नेटवर्क कॅपिसीटी चार्जेस (एनसीएफ) आणि वस्तू व सेवा कर (जीएसटी) हा शुल्कसुद्धा ग्राहकांना द्यावा लागत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत ग्राहकांना ३०० ते ४५० रुपयांपर्यंत केबलचे भाडे मोजावे लागत आहे. पूर्वी २०० ते २५० रुपयांमध्ये बहुतांश चॅनल ग्राहकांना उपलब्ध व्हायचे. त्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यातच पे चॅनल निवडताना पॅकेज घ्यावा की स्वंतत्र चॅनल घ्यावे, यात मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. पॅकेज घेतल्यास वाहिन्यांची संख्या वाढते. त्या संख्येवर एसीएफ चार्जेस वाढतात. स्वतंत्र चॅनल घेतल्यास ते पॅकेजच्या पैशांपेक्षा अधिक दराचे होते. त्यामुळे काय करावे आणि काय नाही, अशा दुविधेत ग्राहक सापडले आहे. अखेर आपले बजेट पाहून ग्राहक चॅनलची निवड करीत असल्याचे दिसून येत आहे.
केबल आॅपरेटर कंट्रोल रूम टाकण्याच्या बेतात
ट्रायच्या नियमावलीचे पालन करीत वाहिन्या पुरविणारे एमएसओवर केबल आॅपरेटरांना अवंलबून राहावे लागत आहे. अमरावतीत तीन ते चार एमएसओद्वारे केबल आॅपरेटरांना वाहिन्या पुरविल्या जात आहेत. एमएसओजवळ वाहिन्यांची कंट्रोल रूम असून, त्यामार्फत ते पे चॅनल कंपनीकडून घेतात. थेट कंपनीकडून पे चॅनल घेतल्यास त्यांचे कमिशन वाढू शकते, अशी धारणा केबल आॅपरेटरांची असून, त्या अनुषंगाने काही जण कंट्रोल रूम टाकण्याच्या बेतात आहेत.
जीएसटी व एनसीएफने वाढविले बजेट
फ्री टू एअर, पे चॅनल व एनसीएफ चार्जेसची रक्कम एकत्रित केल्यानंतर, त्या रकमेवर जीएसटी लावण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांचे केबल ग्राहकांचे बजेट वाढले आहे.
ट्रायच्या वेबसाइटवर करू शकतात तक्रार
केबल ग्राहकांना वाहिन्यांसदर्भात कोणतीही अडचणी आल्यास किंवा तक्रार करायची असेल, तर थेट ट्रायच्या वेबसाइटवर संपर्क करता येऊ शकतो.२
केबल आॅपरेटरांची दमछाक
अमरावती शहरात १०० ते १२५ केबल आॅपरेटर असून, त्यांच्याकडे जवळपास एक लाख ग्राहक आहे. याव्यतिरिक्त डीटूएच ग्राहकांची संख्या वेगळी आहे. केबल आॅपरेटर ग्राहकांकडून अर्ज भरून घेत असून, त्यांना वाहिन्या निवडीबाबत मार्गदर्शनात करीत आहेत. मात्र, अनेक ग्राहक वारंवार केबल आॅपरेटरांकडे चकरा मारत आहेत. ग्राहकांनी निवडलेल्या वाहिन्यांची माहिती केबल आॅपरेटर संगणकात फीड करत आहेत. त्यातच एमएसओने दिलेल्या वेबसाइट संथ आहे किंवा अनेकदा ती उघडतच नसल्याने केबल आॅपरेटरांची दमछाक होत आहे. त्यातच चॅनल अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी रिचार्ज मारण्यास विलंब होत असल्यामुळे ग्राहक वारंवार केबल आॅपरेटरांकडे चकरा घालत आहेत.

फ्री टू एअर अनिवार्य, आवडते पे चॅनलचे वेगळे पैसे, जीएसटी व एनसीएफ चार्जेस ही रक्कम ३०० ते ४०० रुपयांच्या घरात जाते. त्यातच पॅकेज घेतल्यास वाहिन्यांची संख्या वाढते. त्याचा एनसीएफ चार्जेच अधिक द्यावा लागतो. सगळा सावळा गोंधळच आहे.
- राजेश कोरडे, केबल ग्राहक

ग्राहकांना आवडीचे चॅनल मिळत असले तरी निवडीतही ग्राहक गोंधळले आहेत. पॅकेज घ्यावा की स्वतंत्र चॅनल निवडावे, अशी द्विधा मन:स्थितीत ग्राहक आहे. समाजवून सांगितल्यानंतरही ते वारंवार विचारणा करतात. पूर्वी सगळे चॅनल कमी दरात होते; आता ते दर वाढले आहेत.
- प्रवीण डांगे, केबल आॅपरेटर२ङ्म

Web Title: Confusion among cable customers in selecting channels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.