यंदा पीक विमा काढावा की नाही, शेतकऱ्यांमध्ये संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:09 AM2021-06-29T04:09:47+5:302021-06-29T04:09:47+5:30
गतवर्षी मूग, उडीद, सोयाबीन या पिकांचा विमा काढल्यानंतर ही पिके पूर्णपणे वाया गेली. दर्यापूर-अंजनगाव विधानसभेच्या आमदारांनी शेतकऱ्यांना पंधरा दिवसात ...
गतवर्षी मूग, उडीद, सोयाबीन या पिकांचा विमा काढल्यानंतर ही पिके पूर्णपणे वाया गेली. दर्यापूर-अंजनगाव विधानसभेच्या आमदारांनी शेतकऱ्यांना पंधरा दिवसात विमा मिळाला नाही, तर कंपनीवर गुन्हे दाखल करू, अशी घोषणा केली होती. मात्र, ॉआजपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. गतवर्षी मूग, उडिदाचे पीक यलो व्हायरसमुळे नष्ट झाले होते. विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी शेतात जाऊन त्याची पाहणी केली. मात्र, तालुक्यातील सहा मंडळांपैकी एकाच मंडळातील शेतकऱ्यांना विमा परतावा मिळाला. यासंदर्भात जिल्हाक्काऱ्यांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावणार असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी सांगितले. दुसरीकडे आमदार बळवंत वानखडे यांनी विमा कंपनीला केंद्र सरकारकडून निधी आलेला नसल्यामुळे विमा रखडलेला असून शेतकऱ्यांना तो लवकरच मिळेल, असे सांगितले.