वनरक्षकांच्या पदोन्नतीनंतर पदस्थापनेत घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:07 AM2021-05-03T04:07:59+5:302021-05-03T04:07:59+5:30
अनिल कडू परतवाडा : वनरक्षक संवर्गातून वनपाल संवर्गात पदोन्नती दिल्यानंतर त्यांच्या पदस्थापनेत घोळ घालण्यात आल्याची ओरड आहे. यात ...
अनिल कडू
परतवाडा : वनरक्षक संवर्गातून वनपाल संवर्गात पदोन्नती दिल्यानंतर त्यांच्या पदस्थापनेत घोळ घालण्यात आल्याची ओरड आहे. यात शिफारशींसह बदलीस पात्र वनपालांवर अन्याय झाला आहे. समुपदेशनासह नियमांना तिलांजली देण्यात आली आहे. उपवनसंरक्षकांसह लोकप्रतिनिधींच्या शिफारशींना दुर्लक्षित केल्या गेले. नागरी सेवा मंडळ व त्यातील सदस्यांची कार्यप्रणाली यात चर्चेत आली आहे.
मुख्य वनसंरक्षक(प्रादेशिक) अमरावती यांचे २९ एप्रिलचे कार्यालयीन आदेशान्वये २२ वनरक्षकांना वनपालपदी पदोन्नती देण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार त्यांना पदोन्नतीनंतर वन्यजीव विभागासह मेळघाटात पदस्थापना द्यायला हवी होती. पण तसे न करता प्रादेशिकमधली मंडळी पदोन्नतीनंतरही प्रादेशिकमध्येच ठेवल्या गेली. काहींना तर बुलडाण्याचे बुलडाण्यात आणि अमरावतीचे अमरावतीत पदस्थापना दिल्या गेली. यात मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिदुर्गम भागात अनेक वर्षांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या वनपालांना डावलण्यात आले आहे. त्यांचा विनंती अर्ज आणि या अर्जावर उपवनसंरक्षकांकडून आलेल्या शिफारशीही विचारात घेतल्या गेल्या नाहीत. समुपदेशनाची प्रक्रिया राबविली गेली नाही. प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी. पदोन्नतीसह दिल्या गेलेल्या पदस्थापनेस स्थगिती द्यावी. बदली समितीतील, नागरी सेवा मंडळातील सदस्यांची चौकशी करावी, काहींचे कॉल रेकॉर्ड तपासावेत. या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या मेळघाटातील वनकर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.
अनेक पदोन्नतीच्या प्रतीक्षेत
वनविभागाच्या राज्यातील विविध विभागांत वनरक्षकांना वनपालपदी पदोन्नती देण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने नियमानुसार राबविली गेली. यात अनेकांना पदोन्नती मिळाली असून वनपालांच्या राज्यस्तरीय सेवा ज्येष्ठता यादीत त्यांनी आपला क्रमांक निश्चित केला. पण, अमरावती विभागातील वनरक्षक यात पिछाडीवर आहेत. १७ वर्षांपासून अमरावती विभागात कार्यरत वनरक्षकांना, वनपालपदी पदोन्नती देण्यात आलेली नाही. यासाठी ते प्रतीक्षेत आहेत. नियमानुसार पात्र वनरक्षकांना वनपालपदी पदोन्नती मिळावी याकरिता त्यांनी संबंधित वरिष्ठ वनाधिकाऱ्यांकडे निवेदनेही दिली आहेत. पण या पदोन्नतीकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेले नाही. यात सर्वसाधारण वनरक्षकांमध्ये रोष बघायला मिळत आहे. पदोन्नतीस पात्र असतानाही अमरावती विभागातील वनरक्षकांना वनपालपदी पदोन्नती न मिळाल्यामुळे राज्यस्तरीय सेवाज्येष्ठता यादीत त्यांना आपले स्थान व आपला क्रमांक निश्चित करता आलेला नाही.
कोट
संबंधित वनाधिकाऱ्यांचा