लसीकरणाचा गोंधळ निस्तरेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:13 AM2021-05-14T04:13:48+5:302021-05-14T04:13:48+5:30
आता तर चक्क लस उपलब्ध नसल्याने नागरिकांना आल्या पावली वापस जावे लागत आहे. ११ मे पर्यंत ४५ ...
आता तर चक्क लस उपलब्ध नसल्याने नागरिकांना आल्या पावली वापस जावे लागत आहे. ११ मे पर्यंत ४५ वर्षांवरील ५००२ जणांना कोव्हीशिल्डचा पहिला डोज व 1 लसीकरण करण्यात आले. एकंदरीत पाहता मोर्शी तालुक्यातील तर, १९२४ जणांना दुसरा डोज देण्यात आला. तसेच ग्रामीणमध्ये ५८६५ जणांना पहिला तर १२७९ जणांना दुसरा डोज देण्यात आला, तसेच ४५ वर्षावरील शहरातील ११२ व ग्रामीण भागातील ८५७ जणांना कोव्हॅक्सिन लसीकरणाचा डोज देण्यात आला. शहरातील एकही व्यक्तीला कोव्हक्सिनचा दुसरा डोज देण्यात आला नाही. तर ग्रामीण भागातील ९५ लोकांना लसीकरण करण्यात आले.
१ मे पासून सुरू झालेल्या १८ ते ४४ वयोगटातील युवकांना ऑनलाइन पद्धतीने ५५६ लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यामध्ये १८ वर्षावरील नागरिकांना तसेच सध्या देण्यात येणाऱ्या ४५ वर्षावरील नागरिकांसाठीच्या लसीकरणाबाबत जिल्हा प्रशासनाच्या वतीने कृती आराखडा तयार करून जिल्ह्यातील शहरी तथा ग्रामीण भागामध्ये सुनियोजित पद्धतीने लसीकरण करावे जेणेकरून लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही. जिल्ह्यातील १८ वर्षावरील नागरीकांचा आकडा विचारात घेता लसीची योग्य मागणी व साठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे