डिझेल भरताना घोळ, पोलीस आयुक्तांना निनावी पत्राद्वारे माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:12 AM2021-05-15T04:12:16+5:302021-05-15T04:12:16+5:30
अमरावती : पोलीस आयुक्तालयातील मोटार वाहन विभागातील चालक डिझेल भरताना काही घोळ करीत असल्याचे निनावी पत्र पोलीस आयुक्त ...
अमरावती : पोलीस आयुक्तालयातील मोटार वाहन विभागातील चालक डिझेल भरताना काही घोळ करीत असल्याचे निनावी पत्र पोलीस आयुक्त आरती सिंह यांना प्राप्त झाले आहे. या अनुषंगाने पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी चौकशी सुरू केली आहे.
निनावी पत्रामुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यामुळे येथील पाच पोलीस चौकशीच्या घेऱ्यात सापडले आहेत. पोलीस आयुक्तांच्या आदेशाने उपायुक्त विक्रम साळी यांच्याकडे चौकशी सोपविण्यात आली आहे. निनावी पत्रात काही पोलिसांची नावे असून, त्या अनुषंगाने उपायुक्तांनी पाच पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी केल्याची माहिती पुढे आली आहे. परंतु, अद्याप काही ठोस पुरावे हाती लागलेले नाही. मात्र, या निनावी पत्रामुळे पोलीस वाहनांतील डिझेलबाबत काही घोळ उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यासंदर्भात पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांच्याशी संपर्क केला असता, ते निनानी पत्र असून, त्यासंदर्भात वैयक्तिकरीत्या चौकशी सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त (प्रशासन) विक्रम साळी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.