जिजाऊ ब्रिगेडद्वारा पोलीस आयुक्तांचे अभिनंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 09:51 PM2018-03-29T21:51:34+5:302018-03-29T21:51:34+5:30

शहरात गाजलेल्या शीतल पाटील हत्याप्रकरणात वेगवान हालचाली करीत आरोपींना गजाआड केल्याबद्दल जिजाऊ ब्रिगेडने पोलीस आयुक्त व प्रकरणाचे तपास अधिकारी यांचे आयुक्तालयात अभिनंदन केले.

Congratulations to Police Commissioner by Jijau Brigade | जिजाऊ ब्रिगेडद्वारा पोलीस आयुक्तांचे अभिनंदन

जिजाऊ ब्रिगेडद्वारा पोलीस आयुक्तांचे अभिनंदन

Next
ठळक मुद्देशीतल पाटील हत्याकांड : प्री-प्लॅन हत्याप्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय

ऑनलाईन लोकमत
अमरावती : शहरात गाजलेल्या शीतल पाटील हत्याप्रकरणात वेगवान हालचाली करीत आरोपींना गजाआड केल्याबद्दल जिजाऊ ब्रिगेडने पोलीस आयुक्त व प्रकरणाचे तपास अधिकारी यांचे आयुक्तालयात अभिनंदन केले.
पेशाने वकील असलेला आरोपी सुनील गजभियेने पत्नी व सहकाऱ्याच्या मदतीने शीतलची हत्या करून तिच्या आत्महत्येचा बनाव केला. मात्र, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक व त्यांच्या अधिनस्थ अधिकाºयांनी आरोपी निष्पन्न करून त्यांच्याविरोधात भक्कम पुरावे सादर केलेत. यासाठी मयूरा देशमुख व जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त आणि तपास अधिकाºयांचा सत्कार केला. आरोपीने खुनाचे पुरावे नष्ट करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. यामुळे सुरवातीला पोलीसही संभ्रमात होते. परंतु, मृत शीतलच्या डोक्यावर वर्मी घाव लागल्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट मिळाल्याने तिच्या खुनावर शिक्कामोर्तब झाला. प्रकरणात अनेक आरोप झाल्याने पोलिसांवरही ताण वाढला. मात्र, आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या अनुभवी मार्गदर्शनाखाली फ्रेजरपुरा ठाणेदार चोरमले व गाडगेनगर ठाणेदार मनीष ठाकरे व त्यांच्या तपास पथकाने हे अवघड आव्हान स्वीकारून अल्पावधीत पुरावे गोळा करून पसार आरोपी सुनील गजभिये, त्याचा साथीदार रहमानखां पठाण व राजेश्री गजभिये यांना अटक करून गुन्हा उघडकीस आणला व पीडित कुटुंबाला न्याय मिळवून दिला. या कामगिरीबाबत जिजाऊ ब्रिगेडने त्यांचा सत्कार केला. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या मयुरा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शीला पाटील, मनाली तायडे, वर्र्षा धाबे, कीर्र्तिमाला चौधरी, प्रभा आवारे, सोनाली देशमुख, अर्चना सवाई, मीरा देशमुख, प्रतिभा रोडे, भाग्यश्री मोहिते, मंजू ठाकरे, सीमा रहाटे आदी महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या.

Web Title: Congratulations to Police Commissioner by Jijau Brigade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.