अमरावती जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसचा दबदबा, राणा दाम्पत्याला धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2022 11:31 AM2022-09-20T11:31:41+5:302022-09-20T11:37:48+5:30
तीन काँग्रेस, दोन भाजपच्या वाट्याला; हरिसाल, रोहणखेडमध्ये स्थानिक आघाडी
अमरावती : ग्रामपंचायतीसाठी सोमवारी झालेल्या मतमोजणीअंती तीन ग्रामपंचायतींवर काँग्रेस, दोनवर भाजप व दोन ग्रामपंचायतींवर स्थानिक आघाडी भारी पडल्या आहेत. काँग्रेसने आखतवाडा, कवाडगव्हान व उंबरखेड ग्रामपंचायती ताब्यात घेऊन दबदबा कायम राखला आहे. भाजपनेही घोटा व चांदूरवाडी राखले. याशिवाय हरिसाल व रोहणखेड येथे स्थानिक आघाड्यांचा विजय झाला.
सोमवारी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. जिल्हा निवडणूक विभागाच्या माहितीनुसार हरिसाल ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी विजय दारसिंबे विजयी झाले. सदस्यपदी प्रवीण पंडुले, विजय दारसिंबे, जया धुर्वे, गणपत गायन, कामीबाई कासदेकर, संगीता धुर्वे, काशीराम जामुनकर, सुनीता भुसूम, सागर सलामे, जमुना बेठेकर व यशोदा पवार विजयी झाले आहेत.
घोटा ग्रामपंचायतींमध्ये रूपाली राऊत सरपंचपदी, तर सदस्यपदी अरविंद सोनोने, गीता चव्हाण, मंगला इंगोले, राजेश्वर इंगोले, यशोदा राठोड, भारत शिरकरे व उज्ज्वला चौके निवडून आले.
कवाडगव्हाण ग्रामपंचायतीमध्ये मोहिनी चौधरी सरपंच व सदस्यपदी जया चौधरी, प्रिया चौधरी, नंदू महल्ले, मीना मेंढे, अंजली चवधरी, प्रीती वसू व राधेश्याम त्रिशूल विजयी झाले.
चांदूरवाडी ग्रामपंचायतींमध्ये वर्षा माताडे सरपंचपदी, तर सदस्यपदी राहुल तांडेकर, प्रतिभा भगत, अब्दुल शहजाद अब्दुल रजाक, आबिदाबी अजीज शाह, संजय शिंदे, वर्षा माताडे, रंजना ठाकरे विजयी झाल्या.
उंबरखेड ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी नितीन कळंबे, तर सदस्यपदी गजानन बनसोड, अभिजित अळसपुरे, अमिता पांडव, शुभांगी मुंद्रे, कैलास कळंबे, कविता कळंबे यांचा विजय झाला. उंबरखेडच्या संगीता फाले व कवाडगव्हाणच्या मीना मेंढे अविरोध निवडून आल्या आहेत.
रोहणखेड ग्रामपंचायत अविरोध
अमरावती तालुक्यातील रोहणखेड ग्रामपंचायत अविरोध करीत ग्रामस्थांनी आदर्श निर्माण केला आहे. यामध्ये सरपंचपदासाठी वीणा भिलकर तर सदस्यपदाकरिता वनिता तभाने, संगीता इंगळे, गौतम मनोहर, ललिता खडसे, राजेश तायडे, रवि कोल्हे व जयश्री देशभ्रतार विजयी झाले आहेत.
आखतवाडा अविरोध, नामाप्रचे सरपंच, सदस्यपद रिक्त
आखतवाडा ग्रामपंचायतीमध्ये ओबीसीकरिता राखीव असलेले सरपंचपद व एक सदस्यपद उमेदवार न मिळाल्याने रिक्त राहिले. याशिवाय गुलाम रसूल मुस्तफा, नुरस्सुभा शकील मोहमद, मोहमद जहूर सनी मो. कलीम, शमा परवीन अनीश शेख, जनार्दन लांडगे, कैसरजहा जहीर शेख अविरोध निवडून आले आहेत.