१३४ ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 11:51 PM2017-10-17T23:51:37+5:302017-10-17T23:51:54+5:30
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या यशानंतर काँग्रेसने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवरदेखील झेंडा फडकविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या यशानंतर काँग्रेसने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवरदेखील झेंडा फडकविला आहे. जिल्ह्यातील २५५ ग्रामपंचायतींचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. त्यापैकी १३४ ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात गेल्या आहेत. भाजप सरकारने गत तीन वर्षांपासून शेतकरी सर्वसामान्यांची केलेली दिशाभूल पुढे येत असून, खºया अर्थाने ही पुढील विधानसभेची कलचाचणी असल्याचे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
जिल्ह्यातील २५५ ग्रामपंचायतींकरिता १६ आॅक्टोबर रोजी निवडणुका पार पडल्या. मंगळवारी दुपारपर्यंत सर्वच ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले. या निवडणुकीमध्ये काँग्रेसने आपले वर्चस्व सिद्ध करीत २४९ पैकी १३४ ग्रामपंचायतींवर कब्जा केला. या निवडणुकीतून गेल्या तीन वर्षांपासून जनतेची दिशाभूल करणाºया भाजपला त्यांची जागा मतदारांनी आता खºया अर्थाने दाखवून दिलेली आहे. ग्रामस्तरावर अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाºया ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला धक्का देत काँग्रेस पहिल्या क्रमांकावर आली आहे. १३४ सरपंच काँग्रेसचे निवडून आले असून, उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये मोठ्या संख्येने सदस्य निवडून आले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या यशानंतर काँग्रेसने ग्रामपंचायतींवरदेखील कब्जा करीत आपला झेंडा कायम ठेवला आहे.
भाजप शासनाने आतापर्यंत जनतेची फसवणूकच केली आहे. थेट सरपंचपदाची निवडणूक भाजपने ज्यासाठी लावली होती, तो डाव मतदारांनी धुळीस मिळविला. यापूर्वीच या शासनाचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. नांदेड महानगरपालिकेमध्ये मतदारांनी यावर शिक्कामोर्तब केले, तर आता अमरावती जिल्ह्याच्या मतदारांनी भाजपला धक्का देऊन त्यांचा परतीचा मार्ग प्रशस्त केला आहे. कर्जमाफी, महागाई, जीएसटी याचाच जाब जनतेने दिल्याचे मत जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी व्यक्त केले.
ग्रामपंचायत निवडणूक ही विधानसभेची कलचाचणी असून, येणाºया विधानसभेच्या निवडणुकांमध्ये संपूर्ण जिल्हाच काँग्रेसमय होईल, असा दावा बबलू देशमुख यांनी यावेळी केला. ग्रामपंचायत निवडणुकीच्या यशानंतर त्यांनी लोकांचे आभार मानले आहे.