धारणीत उभय काँग्रेसचा झेंडा

By admin | Published: December 1, 2015 01:39 AM2015-12-01T01:39:53+5:302015-12-01T01:39:53+5:30

नवनिर्मित धारणी नगर पंचायतवर राष्ट्रवादी व काँगे्रसने युती करून अध्यक्ष व उपाध्यक्षपदी महिलांची निवड केली.

Congress flag hoisting in Dharna | धारणीत उभय काँग्रेसचा झेंडा

धारणीत उभय काँग्रेसचा झेंडा

Next

राजकुमार पटेलांचा करिष्मा कायम : अध्यक्ष रजियाबी सरफुद्दीन, उपाध्यक्ष रेखा पटेल
धारणी : नवनिर्मित धारणी नगर पंचायतवर राष्ट्रवादी व काँगे्रसने युती करून अध्यक्ष व उपाध्यक्षपदी महिलांची निवड केली. राष्ट्रवादी काँगे्रसच्या रजियाबी मो. सरफुद्दीन यांची अध्यक्षपदी तर काँग्रेसच्या रेखा विजय पटेल यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. दोघांना ११ मते मिळाली होती. अध्यक्षपदाकरिता भाजपाच्या प्रियम चौकसे यांना शिवसेनेने समर्थन देत केवळ ६ मते मिळाली. शिवसेनेच्या मनीषा मालवीय यांनी स्वत:चे मतही अध्यक्षपदाच्या भाजप उमेदवाराला दिले. उपाध्यक्षपदाकरिता काँग्रेसच्या रेखा विजय पटेल यांच्या विरोधात शिवसेनेच्या सुनील चौथमल यांनी अर्ज भरला होता. त्यांना ६ मते मिळाली. स्वीकृत सदस्यपदी राकाँतर्फे शैलेश केशव जिराफे यांची तर भाजपतर्फे सत्यदेव गुप्ता यांची निवड करण्यात आली. येथे स्थानिक आमदार प्रभूदास भिलावेकर यांचा करिष्मा चालला नाही.

मेळघाटचे आमदार भाजपचे असताना धारणी नगरपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता आल्याने भाजपने आत्ममंथन करावे. धारणीच्या विकासासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करू.
- राजकुमार पटेल,
नेते, राष्ट्रवादी काँग्रेस.


भाजप-शिवसेनेचा सफाया
धारणी : निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर राकॉंचे राजकुमार पटेल यांच्या नेतृत्वात मिरवणूक काढण्यात आली.
निवडणूक प्रक्रिया एसडीओ व्यंकट राठोड, नायब तहसीलदार कृष्णा भामकर, सहायक राहूल घोगरे आणि अतुल पवार यांनी काम पाहिलेत. निवड पक्रियेनंतर राकॉंचे गटनेते विनोद वानखडे, शिवेसेनेचे गटनेते सुनील चौथमल यांनी गावातील समस्या निकाली काढण्यासाठी सामूहिक प्रयत्नाने काम करण्याचे आश्वासन दिले. विजयी जल्लोषामध्ये माजी खासदार राजकुमार पटेल, राकाँ तालुकाध्यक्ष प्रकाश घाडगे, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष लोभीलाल मालवीय, हरेराम मालवीय, आसीफ सौदागर, हुकूमचंद मालवीय, शैलेश जराफे, लक्ष्मीकांत पटोरकर यांची सहभाग होता. सभेमध्ये राकॉंचे ८, भाजपचे ४, कॉंग्रेसचे ३ तर शिवसेनेचे २ असे एकूण सर्व १७ सदस्य उपस्थित होते.

Web Title: Congress flag hoisting in Dharna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.