वरुड बाजार समितीवर काँग्रेसचा झेंडा

By Admin | Published: April 17, 2016 12:04 AM2016-04-17T00:04:49+5:302016-04-17T00:04:49+5:30

स्थानिक बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ संचालक पदाकरिता झालेल्या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसला १७ जागा मिळाल्याने बहुमतात सत्ता आली.

Congress flag on Vadod Bazar Samiti | वरुड बाजार समितीवर काँग्रेसचा झेंडा

वरुड बाजार समितीवर काँग्रेसचा झेंडा

googlenewsNext

सभापतीपदी अजय नागमोते : उपसभापती अनिल गुल्हाणे
वरूड : स्थानिक बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ संचालक पदाकरिता झालेल्या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसला १७ जागा मिळाल्याने बहुमतात सत्ता आली. बाजार समितीच्या सभापती अजय नागमोते तर उपसभापतीपदी अनिल गुल्हाने यांची अविरोध निवड झाली.
वरुड बाजार समिती १८ संचालकपदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे नरेशचंद्र ठाकरे यांच्या शेतकरी पॅनेलला बहुमत मिळाले असून १७ ही जागांवर बहुमत प्रस्थापित केले होते. यांनतर सभापती उपसभापतिपदाची निवडणूक घेण्यात आली असून यामध्ये सभापती पदाकरिता अजय नागमोते व उपसभापतिपदासाठी अनिल गुल्हाने यांची अविरोध निवड झाली. यावेळी नवनिर्वाचित संचालक सुधाकर दोंड, अजय पांडव, सुरेंद्र आहाके, जाबीर खॉ जहांगीर खॉ, राजेश गांधी, प्रवीण बहुरुपी, नरेंद्र पावडे, गजानन काळे, अनिल सुपले, रोशन देशमुख, वनराज कराळे, अमोल बोहरुपी, रजनी भोंड, माधुरी पडोळे, पंजाबराव कवाने उपस्थित होते.
काँग्रेसचे नरेशचंद्र ठाकरे गटाचे शेतकरी पॅनेलला १७ जागा मिळाल्याने काँग्रेसचे पुन्हा एकदा बहुमत सिध्द झाले.
सभापती उपसभापती निवडणुकीच्यावेळी काँग्रेसचे प्रदेश महासचिव नरेशचंद्र ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य तथा वर्धा लोकसभा मतदारसंघाचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष विक्रम ठाकरे, जिल्हा परिषद बांधकाम सभापती गिरीश कराळे, माजी सभापती राजेंद्र पाटील, नरेंद्र चोरे, प्रदीप कांबळे, प्रदीप पांडव, बाबाराव भोंड, मोहम्मद निसार, मो.अश्पाक, अनिल उपासे, जावेद भाई, दिनेश आंडे, राजू खोडे, सातपुडा जिनींगचे अध्यक्ष सुजित पाटील, खविसंचे अध्यक्ष बाबाराव बहुरुपी, प्रकाश अळसपुरे, चंदू अळसपुरे किशोर गुल्हाने, धनंजय बोकडे, उमाशंकर देशमुख, प्रमोद रडके, शम्मू काझी, देवानंद जोगेकर, लिलाधर डोईजोड, मुरली श्रीराव, तुषार निकम, किशोर तडस, अश्वपाल वानखडे, विकास ठाकरे, विजय खडसे यांच्यासह आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Congress flag on Vadod Bazar Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.