धामणगाव, चांदूररेल्वेत भाजप तिवस्यात काँग्रेसला बहुमत
By admin | Published: November 24, 2014 10:49 PM2014-11-24T22:49:10+5:302014-11-24T22:49:10+5:30
जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदूररेल्वे व तिवसा पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल आज सोमवारी घोषित झाला. यात चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे पंचायत समितीवर भाजपने तर तिवसा
अमरावती : जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदूररेल्वे व तिवसा पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल आज सोमवारी घोषित झाला. यात चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे पंचायत समितीवर भाजपने तर तिवसा पंचायत समितीवर काँग्रेसने बहुमत मिळविले आहे.
धामणगाव रेल्वे पंचायत समितीच्या आठ गणांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल सोमवारी घोषित झाला. यात भाजपला ५ तर काँग्रेसला ३ जागांवर समाधान मानावे लागले. जुना धामणगाव सर्कलमधून भाजपचे सचिन पाटील विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे हनुमंत वानखडे यांचा पराभव केला. अंजनसिंगी सर्कलमधून भाजपचे गणेश राजणकर विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे अवधुत दिवे यांचा पराभव केला.
शेंदूरजना खुर्द सर्कलमधून भाजपचे अतुल देशमुख काँग्रेसचे रवीश बिरे यांना पराभूत करुन विजयी झाले. देवगाव सर्कलमधून भाजपचे रोशन कंगाले विजयी झाले. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी काँग्रेसचे अरुण गेडाम यांचा पराभव केला. चिंचोली सर्कलमध्ये भाजपच्या वनिता राऊत विजयी झाल्या आहेत. त्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या मालती पावडे यांचा पराभव केला. वरुड बगाजी सर्कलमधून काँग्रेसच्या सविता इंगळे यांनी बाजी मारली. त्यांनी भाजपच्या तनुजा इंगळे यांचा पराभव केला. मंगरुळ दस्तगिर सर्कलमधून काँग्रेसच्या संगीता निमकर विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या माधुरी भोगे यांचा पराभव केला. तळेगाव दशासर सर्कलमध्ये काँग्रेसच्या प्रिती ढोबळे विजयी झाल्या असून त्यांनी प्रतिस्पर्धी भाजपच्या संगीता गवळी यांचा पराभव केला.
दहा वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या चांदूररेल्वे पंचायत समितीवर यावेळी भाजपने विजयाचा झेंडा रोवला. भाजपचे ४ तर काँग्रेसचे २ उमेदवार विजयी झाले.