काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार सत्तारूढ
By admin | Published: December 1, 2015 01:34 AM2015-12-01T01:34:43+5:302015-12-01T01:34:43+5:30
काँग्रेसचे अक्षय पारसकर यांची नगराध्यक्षपदी व राकाँच्या मुमताजबी नाजिमखां यांची उपाध्यक्षपदी निवड
जगतापांचा वरचष्मा : नगराध्यक्ष अक्षय पारसकर, मुमताजबी उपाध्यक्ष
नांदगाव खंडेश्वर : काँग्रेसचे अक्षय पारसकर यांची नगराध्यक्षपदी व राकाँच्या मुमताजबी नाजिमखां यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. त्यांना प्रत्येकी ११ मते मिळालीत. तालुक्यात नेहमीच रंगणारे भाजप-काँग्रेसचे राजकारण या निवडणुकीत खेळल्या गेले. मात्र, भाजप-सेनेला सत्तेचा लाभ मिळवता आला नाही.
कॉँग्रेसचे आ. वीरेंद्र जगताप व राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मो. जावेदभाई यांची कॉँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी स्थापन झाली. या आघाडीत कॉँग्रेसचे ७ सदस्य, राष्ट्रवादीचे २, अपक्ष १, आणि युवा स्वाभिमान समर्थित १ अपक्ष अशा ११ सदस्यांचा समावेश होता. त्याचे प्रतिस्पर्धी भाजपाचे प्रमोद पिंजरकर यांना ६ मते व उपाध्यक्षांसाठी शिवसेनेचे अरुण लाहाबर यांना ६ मते मिळाली. या निवडणूकीत डॉ. संजय जेवडे व ओंकार ठाकरे यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
गावपातळीवर काँग्रेस मजबूत आहेच. हे या निवडणुकीचे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. खासदार मंत्र्यांच्या प्रलोभनाला बळी न पडलेल्या नांदगावत खंडेश्वरवासियांचा हा विजय आहे.
- वीरेंद्र जगताप,
आमदार, चांदूररेल्वे.
आघाडीचा वरचष्मा कायम
नांदगाव खंडेश्वर : आ. जगताप यांच्या नेतृत्वात नगरपंचायतीवर आघाडीने वरचष्मा कायम केला. यानंतर आ. वीरेंद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. यावेळी म. जावेदभाई, देवीदासजी सुने, माणकचंदजी जैन, बापूरावजी सोनोने, विठ्ठलराव चांदणे, नितीन टाले, इद्रिस भाई, सुखदेवराव शिरभाते, गणपतराव रावेकर, सलीमभाई नारायणराव लायबर, अमोल शिरभाते, जमीलभाई जब्बारभाई, फिरोजखान, राजेश जाधव, विनोद चौधरी व नांदगांव शहरातील बरीच मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती. (तालुका प्रतिनिधी)