सत्तेसाठी काँग्रेस-एनसीपी-सेनेची गट्टी

By admin | Published: March 20, 2017 12:04 AM2017-03-20T00:04:40+5:302017-03-20T00:04:40+5:30

राजकारणात कायम कुणी कुणाचा शत्रू किंवा मित्र म्हणून राहत नाही, याचा प्रत्यय जिल्हा परिषदेच्या नव्या राजकीय समीकरणावरून दिसून आला.

Congress-NCP-Senechi Gatti for power | सत्तेसाठी काँग्रेस-एनसीपी-सेनेची गट्टी

सत्तेसाठी काँग्रेस-एनसीपी-सेनेची गट्टी

Next

जिल्हा परिषद : सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा, मंगळवारी निवडणूक
अमरावती : राजकारणात कायम कुणी कुणाचा शत्रू किंवा मित्र म्हणून राहत नाही, याचा प्रत्यय जिल्हा परिषदेच्या नव्या राजकीय समीकरणावरून दिसून आला. सत्तास्थापनेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व अपक्षांनी मैत्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर रविवार १९ मार्च रोजी शिक्कामोर्तब झाले आहे. या नव्या मैत्रीने भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाअध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत सर्वाधिक सदस्य असलेल्या काँग्रेस पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ शिवसेना व दोन अपक्ष सदस्यांनी युती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सत्तास्थापनेसाठी काँग्रेस सोबत वरील सर्व पक्ष संयुक्त निवडणूक लढणार आहेत. यात अध्यक्षपद काँग्रेसकडे, तर उपाध्यक्षपद शिवसेनेकडे राहणार आहे. याशिवाय चार विषय समिती सभापती, जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा परिषद स्थायी समितीचे सदस्यपदाकरिता काँग्रेसला शिवसेना, अपक्ष यांचे बिनशर्त समर्थन देण्यावर या बैठकीत एकमत झाले. या युतीच्या चर्चेदरम्यान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आमदार वीरेंद्र जगताप, यशोमती ठाकूर, माजी आमदार केवलराम काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन देशमुख याशिवाय शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय बंड, राजेश वानखडे, प्रशांत वानखडे, दिनेशनाना वानखडे, सुधीर सूर्यवंशी, नाना नागमोते, बाळासाहेब भागवत, उमेश अर्डक, सुनील भालेराव आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. या चर्चेत सभापती पदाचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार काँग्रेसकडे राहतील, यावर एकमताने संमती देण्यात आली. ही सर्व राजकीय खेळी लक्षात घेता आता जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता येणार आहे. जिल्हा परिषद सभागृहाची सदस्य संख्या ५९ आहे. सत्ता स्थापनेसाठी ३० हा मॅजिक फिगर आहे. सध्या काँग्रेस व रिपाइं मिळून २७ सदस्य आहेत. आता नव्या राजकीय मैत्रीमुळे काँग्रेसकडे राष्ट्रवादीचे दोन, शिवसेना ३ आणि अपक्ष दोन असे एकूण ३४ सदस्य संख्या झाली आहे. यातही अधिक वाढ होण्याची शक्यता असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिरूध्द ऊर्फ बबलू देशमुख यांनी सांगितले. एकीकडे काँग्रेसचा सत्तास्थापनेसाठी मार्ग मोकळा झाला असला तरी विरोधी पक्ष असलेल्या भाजपानेही जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. सत्ता स्थापनेसाठी आवश्यक मॅजिक फिगर जुळविण्यासाठी सर्वच प्रकारे फंडे वापरणे सुरू केले आहेत. परंतु रविवारी घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे भाजपाला आता सत्तेबाहेर राहून विरोधी पक्षात बसावे लागण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

काँग्रेसचा अध्यक्ष तर उपाध्यक्ष सेनेचा होणार
जिल्हा परिषदेत यावेळी सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसने नवी राजकीय तडजोड केली आहे. यामध्ये २१ मार्च रोजी होणाऱ्या अध्यक्ष व उपाअध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अध्यक्षपद हे काँग्रेसकडे, तर उपाअध्यक्ष पद शिवसेनेकडे राहणार आहे. तर विषय समितीवर काँग्रेस व अन्य मित्रपक्षांना संधी मिळण्याची शक्यता यासर्व घडामोडींवरून दिसून येते.

नव्या शिल्लेदारांची नावे गुलदस्त्यात
जिल्हा परिषदेचे नवीन अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच सभापती कोण होणार, याबाबत सर्वच ठिकाणी अनेक नावे चर्चेत आहेत. त्यामुळे नेमक ी नवे शिलेदार म्हणून कुणाची वर्णी लागणार हे मंगळवार २१ मार्च रोजीच स्पष्ट होणार आहे. सध्या अध्यक्ष व उपाअध्यक्ष पदाचे उमेदवार कोण आहेत याची नावे मात्र राजकीय पक्षांनी उघड केली नाहीत.

पक्षनिहाय बलाबल
काँग्रेस-२६,रिपाइं-१, राष्ट्रवादी-५, प्रहार-५, भाजपा १३, शिवसेना ३, बसपा-१, युवा स्वाभिमान-२, स्वाभिमानी शेतकरी संघटना-१, लढा-१, अपक्ष-१ एकूण ५९

सदस्य देवदर्शनाला
काँग्रेस व राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे व अपक्ष सदस्यांमध्ये फुटू नये यासाठी हे सर्व सदस्य देवदर्शन व सहलीवर शनिवार रात्री विविध ठिकाणी रवाना झाले आहेत. मागील वेळी काँग्रेसला अध्यक्ष, उपाअध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या दिवशीच झालेल्या दगाबाजीमुळे सत्ता गमवावी लागली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा फंडा वापरण्यात आला आहे. सध्या हे सर्व सदस्य संपर्क क्षेत्राबाहेर आहेत. या सदस्य, नेतेही गेले आहेत.

Web Title: Congress-NCP-Senechi Gatti for power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.