कॉंग्रेसतर्फे मोदींच्या नेतृत्वातील अपयशी सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:10 AM2021-05-31T04:10:26+5:302021-05-31T04:10:26+5:30
जिल्हा कचेरीवर धरणे, काळे झेंडे दाखविले, शहर, जिल्हा कॉंग्रेसचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींची उपस्थिती अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील ...
जिल्हा कचेरीवर धरणे, काळे झेंडे दाखविले, शहर, जिल्हा कॉंग्रेसचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींची उपस्थिती
अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने अपयशी सात वर्षे पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसतर्फे रविवारी निषेध करण्यात आला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देत काळे झेंडे दाखविण्यात आले.
कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. आमदार सुलभा खोडके, आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, माजी महापौर विलास ईंगोले यांची लक्षणीय उपस्थिती होती. यावेळी कॉंग्रेसने काळ्या पट्ट्या बांधून मोदी सरकारचा कडाडून विरोध केला. मोदींच्या सात वर्षाचा काळात देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. कोरोना साथरोगामध्ये सरकार नियोजनशून्य ठरली. दररोज पेट्रोल, डिझेल्स व जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढत आहे. जीएसटी व नोटबंदीसारखे अपयशी निर्णय, देशातील वाढती बेरोजगारी व शेतकऱ्यांच्या विरोधात काळे कायदे आणून मोदी सरकार जनविरोधी ठरली आहे.
धरणे आंदोलनात भैया पवार, सुधाकर भारसाकळे, प्रकाश साबळे, बाळासाहेब हिंगणीकर, सुरेश निमकर, दयाराम काळे, संजय वाघ, भैयासाहेब निचत, हरिभाऊ मोहोड, राजीव बेले, शोभा शिंदे, प्रशांत डवरे, सलीम बेग, अनिल माधोगढिया, फिरोज खान, कांचनमाला गावंडे, प्रदीप देशमुख, प्रकाश काळबांडे, संजय वानखडे, संजय लायदे, सुभाष मनोहर, प्रदीप देशमुख, नितीन दगडकर, सुनील गावंडे, प्रदीप देशमुख, विनोद पवार, श्याम देशमुख, प्रवीण वाघमारे, शिवाजी बंड, पंकज मोरे, परीक्षित जगताप, सिध्दार्थ बोबडे, राहुल येवले, सुजाता झाडे, जयश्री वानखडे, योगिता गिरासे, सुरेश रतावा, राजाभाऊ चौधरी, नीलेश गुहे, राजा बांगडे, अब्दुल रफीक, पंकज मोरे, सागर यादव, रमेश राजोटे, ऋग्वेद सरोदे, राजेश चव्हाण, हुसैन बगदादी, राजेश ठाकूर, प्रथमेश गवई, प्रकाश पहुरकर, संजय बोबडे, किशोर रायबोले, गजानन राजगुरे, प्रकाश वालदे आदींची उपस्थिती होती.
--------------------