नगराध्यक्षपदी काँग्रेस-राकाँ आघाडीचे अभिजित सराड

By admin | Published: December 1, 2015 01:43 AM2015-12-01T01:43:37+5:302015-12-01T01:43:37+5:30

चांदूररेल्वे नगरपालिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक निवडणूक अधिकारी इकबाल अहमद यांचे अध्यक्षतेखाली

Congress-Rakha Alliance's Abhijit Sarad | नगराध्यक्षपदी काँग्रेस-राकाँ आघाडीचे अभिजित सराड

नगराध्यक्षपदी काँग्रेस-राकाँ आघाडीचे अभिजित सराड

Next

चांदूररेल्वे : चांदूररेल्वे नगरपालिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक निवडणूक अधिकारी इकबाल अहमद यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. नगराध्यक्षपदाकरिता काँग्रेसतर्फे अभिजित सराड, भाजपाचेवतीने शंकरलाल मानकानी, अपक्ष प्रमोद हरगोविंद वानरे यांनी नामांकन दाखल केले होते. आज नगरपरिषद सभागृहात निवडणूक अधिकारी यांनी सुरू करण्यात आली. काँग्रेसचे अभिजित सराड यांना ९ नगरसेवकांनी पाठिंबा दिला, तर शंकर मानकानी यांना ७ नगरसेवकांनी पाठिंबा दिला. अपक्ष म्हणून अध्यक्षपदाकरिता नामांकन भरलेले वानरे यांनी काँग्रेसच्या उमेदवारांना समर्थन दिले. पक्षीय बलाबल काँग्रेस ६, भाजप ४, सेना २, राकाँ १, अपक्ष १, भाजपातून बंडखोरी करून काँग्रेस गोटात सामील झाले २ असे होते. सराड यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेसचे ६, राकाँ १, भाजपातून बंडखोरी करणारे २ यांनी पाठींबा दिल्याने ९ नगरसेवकांची संख्या झाल्याने काँग्रेसचे अभिजित सराड यांचा विजय झाला. भाजपासोबत भाजपाचे ४, सेना २, अपक्ष १ नगरसेवकांनी पाठिंबा दिला.
अध्यक्षपदी सराड यांची निवड होताच सभागृहाबाहेर फटाक्याच्या आतषबाजीने स्वागत करण्यात आले. अभिजित सराड यांचे निवडीबद्दल आ. वीरेंद्र जगताप, राकाँ नेते गणेश रॉय, एस. टी. मेहरे, विजय डोंगरे, अनिल आठवले, न. प. उपाध्यक्ष ऋतिका आठवले, सभापती प्रभाकरराव वाघ, उपसभापती अशोक चौधरी, बंडूभाऊ देशमुख, गोविंदराव देशमुख, अशोक भय्या, जयस्वाल, गणेश आरेकर, सुरेश मेश्राम यांच्यासह काँग्रेस, राकाँच्या कार्यकर्त्यांना जल्लोषात स्वगात करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Congress-Rakha Alliance's Abhijit Sarad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.