चणा खरेदीच्या मागणीसाठी काँग्रेसची जिल्हाकचेरीवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 11:03 PM2019-03-11T23:03:55+5:302019-03-11T23:04:19+5:30
शासकीय चणा खरेदीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी आणि व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट थांबवावी आदी मागण्यांसाठी ८ मार्च रोजी जिल्हा प्रशासनाला काँग्रेस पक्षाच्यावतीने अल्टिमेटम् दिला होता. त्यानंतरही निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे सोमवार, ११ मार्च रोजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शासकीय चणा खरेदीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी आणि व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट थांबवावी आदी मागण्यांसाठी ८ मार्च रोजी जिल्हा प्रशासनाला काँग्रेस पक्षाच्यावतीने अल्टिमेटम् दिला होता. त्यानंतरही निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे सोमवार, ११ मार्च रोजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली.
राज्य शासनाकडे वेळोवेळी मागणी केल्यानंतरही जिल्ह्यात अद्यापही शासकीय हरभरा खरेदीची नोंदणी व खरेदीबाबत कार्यवाही केलेली नव्हती. परिणामी व्यापाऱ्यांकडून प्रतिक्विंटल १२०० ते १३०० रूपये फरकाने सर्रास शेतकºयांची लूट होत आहे. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक नुकसानीचा फटका सहन करावा लागत आहे. तातडीने हरभरा खरेदीची नोंदणी प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे आ. वीरेंद्र जगताप यांनी रेटून धरली. तुरीचे चुकारे, बोंडअळी अनुदान, समृद्धी महामार्गातील शेतकºयांच्या तक्रारीवर कारवाई, चांदूर रेल्वे तालुका व शहरातील पाणीटंचाई, बियाणे कंपन्यांकडून बोगस बियाणे पुरवठ्यामुळे इतर अनेक तालुक्यांतील १८५ कोटींच्या नुकसानाची भरपाई आदी मुद्यांवर जिल्हाधिकाºयांसोबतच चर्चा केली. यासोबतच नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील मातंंग समाजाच्या घरकुल मुद्यावरही चर्चा करू न न्याय देण्याची मागणी केली. हरभरा खरेदीची प्रक्रिया शुक्रवार १५ मार्च पासूनसुरू करण्याचे आश्वासन सहकार विभागाचे अधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे आंदोलन निवळले. यावेळी झेडपी अध्यक्ष नितीन गोंडाणे, केवलराम, काळे, सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे, सुधाकर भारसाकळे, मोहन सिंगवी, सदस्या वासंती मंगरोळे, बाळासाहेब हिंगणीकर, अनिता मेश्राम, हरिभाऊ मोहोड, सुरेश निमकर, नितीन दगडकर, गणेश आरेकर, नगराध्य सिटू सूर्यवंशी, प्रदीप वाघ, राजेंद्र गोरले, महेंद्र गैलवार, दयाराम काळे, पंकज मोरे, गजानन राठोड, राहुल येवले, भागवत खांडे, बिटू मंगरोळे, प्रमोद दाळू, नीलेश घोडेराव, शिवाजी बंड, संजय वानखडे, प्रकाश काळबांडे, अभिजित देवके, बापूराव गायकवाड, हरिभाऊ गवर्इं, अमोल होले, परिक्षित जगताप,बबलू बोबडे, बच्चू बोबडे, श्रीधर काळे, प्रदीप देशमुख, वीरेंद्रसिंह जाधव, संजय सरोदे शेखर औघड आदी पदाधिकारी उपस्थित होते.