नांदगावात काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम व सायकल रॅली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:11 AM2021-07-20T04:11:27+5:302021-07-20T04:11:27+5:30

पेट्रोल, डिझेल, गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीचा निषेध. नांदगाव खंडेश्वर तालुका प्रतिनिधी. इंधन दरवाढ आणि जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईविरोधात काँग्रेसच्या ...

Congress signature campaign and cycle rally in Nandgaon. | नांदगावात काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम व सायकल रॅली.

नांदगावात काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम व सायकल रॅली.

Next

पेट्रोल, डिझेल, गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीचा निषेध.

नांदगाव खंडेश्वर तालुका प्रतिनिधी.

इंधन दरवाढ आणि जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईविरोधात काँग्रेसच्या वतीने माजी आमदार प्रा. विरेंद्र जगताप यांच्या नेतृत्त्वात नांदगावात स्वाक्षरी मोहीम व सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी मोदी सरकारचा निषेध करण्यात करण्यात आला. ही सायकल रॅली बसस्थानकावरून निघून गावातील प्रमुख चौकातून घोषणा देत तहसील कार्यालयात गेली. नंतर तहसीलदार यांना निवेदन सादर केले.

यावेळी माजी आमदार विरेंद्र जगताप, युवक काँग्रेसचे राज्य सचिव परीक्षित जगताप, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दीपक सवाई, शहर काँग्रेसचे अध्यक्ष अमोल धवसे, माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर, सचिन रिठे, सुनील शिरभाते, निशिकांत जाधव, पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब इंगळे, मनोहर बगळे, विनोद चौधरी, देवेंद्र सव्वालाखे, सुधाकर डोंगरे, रणजित मेश्राम, गौतम सोनोणे, मदन काजे, राजेश जाधव, आशिष चवाळे, भीमराव रंगारी, नितीन इंगोले, दिलीप तामगाडगे, सरफराज, संजय कुंभलकर, प्रफुल्ल कापडे, नीलेश सुने, हकीम भाई, शेख हरून, पंकज सोळंके, म. साजिद, उमेश सोनोणे, मोरेश्वर भेंडे विशाल रिठे, संजय परसनकर, होमदेव घोडे, सुनील इंझळकर, सतीश पोफळे, अक्षय गुल्हाने, सुनील बिटले, प्रदीप ब्राह्मणवाडे, अजय लाड, योगेश काळेकर, योगेश चव्हाळे, गजानन मारोटकर, अमोल चव्हाळे, मोरेश्वर दिवटे, विनोद जगताप, शिवाजी चव्हाण, इनुस सर, पंकज सोळंके, प्रवीण लळे, अ. जुनेद, प्रशांत झिमटे यांच्यासह नांदगावातील व तालुक्यातील काँग्रेसची मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती.

190721\img-20210719-wa0005.jpg

काँग्रेसची इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅली.

Web Title: Congress signature campaign and cycle rally in Nandgaon.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.