धारणीत काँग्रेस समर्थित उमेदवारांची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 11:20 PM2017-10-28T23:20:49+5:302017-10-28T23:21:01+5:30

तालुक्यातील आठ जागांसाठी थेट सरपंचाचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यात काँग्रेसचे माजी आमदार केवलराम काळे यांनी सात जागांवर विजय मिळविल्याचा, ...

Congress support candidates | धारणीत काँग्रेस समर्थित उमेदवारांची बाजी

धारणीत काँग्रेस समर्थित उमेदवारांची बाजी

Next
ठळक मुद्देग्रामपंचायत निकाल जाहीर; काँग्रेसचा ७, भाजपचा ३ जागांवर दावा

श्यामकांत पाण्डेय।
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : तालुक्यातील आठ जागांसाठी थेट सरपंचाचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यात काँग्रेसचे माजी आमदार केवलराम काळे यांनी सात जागांवर विजय मिळविल्याचा, तर भाजपचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी तीन ग्रामपंचायतींवर भाजपचे सरपंच निवडून आल्याचा दावा केला. मोगर्दा ग्रामपंचायतीवर ग्रामविकास एकता पॅनलने बाजी मारल्याचे जाहीर केले. निकालानंतर तीन ग्रामपंचातीवर दाव्यासंर्भात चढाओढ निर्माण झाली आहे.
स्थानिक तहसील कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या मतमोजणीनंतर राजकिय पक्षांची दावे प्रतिदावे सादर केले. माजी आमदार केवलराम काळे आणि जिल्हा परिषद सदस्य महेंद्रसिंह गैलवार यांनी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजा पाटील यांच्या नेतृत्वात चक्क विजयी जुलूस काढीत आठपैकी सात ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे सरपंच निवडून आणल्याचा दावा केला. केवळ नागझीरा वगळता इतर सर्व सात ग्रामपंचायतींवर काँग्रेसने सत्ता स्थापित केल्याचा त्यांनी दावा केला आहे.
दुसरीकडे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी भाजपचे नागझीरा, घुटी आणि हरदोली या तीन ग्रामपंचायतींच्या सरपंच भाजपचे असल्याचा दावा केला आहे. या तिन्ही ग्रामपंचायतींचे सरपंच भाजपचे असल्याचा दावा केला आहे. या तिन्ही ग्रामपंचायतींचे सरपंच त्यांच्या निवासस्थानी उपस्थित असल्याचा त्यांनी दावा केला, तर मोगर्दा ग्रामपंचायतवर ग्रामविकास एकता पॅनलचा विजयाचा दावा करण्यात आला आहे.
शनिवारी झालेल्या सरपंचाच्या मतमोजणीत मोगर्दा येथे कुसुम धांडे, नागझीरा येथे रामकिशन धांडे, टिटंबा येथे सूरज मावस्कर, घुटी येथे मुंदाबाई धुर्वे, बैरागड येथे सविता सावलकर, राणामालूर येथे गंगाबाई जावरकर, हरदोली येथे तारासिंग कासदेकर, तर तातरा येथे ललिता जांबेकर विजयी झाल्या असल्याचे जाहीर करण्यात आले.

Web Title: Congress support candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.