काँग्रेसचा तहसीलमध्ये ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 11:32 PM2017-11-21T23:32:13+5:302017-11-21T23:32:32+5:30
आॅनलाईन लोकमत
अंजनगाव सुर्जी : तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने येथील तहसील कार्यालयात तालुकाध्यक्ष सुरेश आडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता ठिय्या आंदोलन करण्यात आले.
गुलाबी बोंडअळीमुळे कपाशीच्या पिकाचे ९० टक्क््यांवर नुकसान झाले आहे. आता वातावरणातील बदलामुळे तुरीचे पीक अळीच्या प्रादुर्भावामुळे हातचे जात आहे. मागील वर्षाचे नाफेडने खरेदी केलेल्या तुरीची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाही अशा दुष्काळी परिस्थितीत वीज वितरण कंपनीकडून शेतातील वीज कनेक्शन बंद करण्याचा सपाटा लावलेला आहे. त्यामुळे यावेळी संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शासनाकडून प्हेक्टरी ५० हजार रूपये नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळावी आणि कर्जमाफी व वीजबिलमाफी व्हावी, अशी मागणी करण्यात आली.
ठिय्या आंदोलनामध्ये तालुकाध्यक्ष सुरेश आडे, शिवाजी हरणे, नरेंद्र निचळ, सुफी, चंद्रशेखर घोगरे, शिवरतन घोगरे, मुरलीधर तुरखडे, सत्यविजय निपाणे, शाम गायगोले, भास्करराव हरणे, प्रशांत गायगोले, आदिलभाई, सुरेश काकड, पुरुषोत्तम घोगरे, बबलू काळमेघ, हिम्मतराव आठवले, विशाल सपाटे, ज्ञानेश्वर मुरतकर, गजानन घुरडे, अमर शिंगणे, दिनेश देशमुख, श्रीकृष्ण गावंडे, भा. इं. इंगोले, सुषमा कोकाटे, नलिनी गोमासे, भोजराज कावरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.