तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काँग्रेस मजबूत करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:09 AM2021-07-05T04:09:30+5:302021-07-05T04:09:30+5:30

सुनील देशमुख यांचा कृतज्ञता सोहळ्यात निर्धार अमरावती : प्रस्थापितांनी व्यक्तिगत साम्राज्य निर्माण करून काँग्रेस संपविण्याचा प्रयत्न केला. आता जातीपातीचे ...

The Congress will be strengthened by bringing together grassroots activists | तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काँग्रेस मजबूत करणार

तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काँग्रेस मजबूत करणार

googlenewsNext

सुनील देशमुख यांचा कृतज्ञता सोहळ्यात निर्धार

अमरावती : प्रस्थापितांनी व्यक्तिगत साम्राज्य निर्माण करून काँग्रेस संपविण्याचा प्रयत्न केला. आता जातीपातीचे राजकारण न करता सर्वसामान्य, तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटन मजबूत करणार आहे. कठीण परिस्थितीत किशोर बोरकर यांनी सर्व समाजाला सोबत घेऊन काँग्रेसची चळवळ उभी केली आहे, असे प्रतिपादन सत्कारमूर्ती डॉ. सुनील देशमुख यांनी केले.

माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी अमरावती शहरासह जिल्ह्याच्या विकासासाठी केलेल्या भरीव योगदानासाठी कृतज्ञता समारंभ काँग्रेस दिव्यांग विभागाचे प्रदेशाध्यक्ष किशोर बोरकर यांनी आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार दिलीप एडतकर होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ नेते शंकरराव हिंगासपूरे, ज्येष्ठ विधिज्ञ पी.एस. खडसे, बी.आर. देशमुख उपस्थित होते. याप्रसंगी किशोर बोरकर, दिलीप एडतकर, बी.आर. देशमुख, पी.एस. खडसे, शंकरराव हिंगासपुरे, अभिनंदन पेंढारी, डॉ. रिठे, भैयासाहेब निचत, जगदीश गोवर्धन आदींनी मनोगत व्यक्त केले. संचालन सलीम मिरावाले व आभार प्रदर्शन सुजाता झाडे यांनी केले. कार्यक्रमाला भैयासाहेब पवार, रज्जू बाबा, राजा चौधरी, दिनेश खोडके, अतुल काळबांडे, खोजयम्मा खुर्रम, नियाज भाई, सुरेश दहिकर, उमेश रिठे, राजेश चव्हाण, फादर डॅनियाल, अनिल माधोगडीया, संजय बोबडे, करीमा बाजी, यास्मा परविन, शेख हबीब, राजीक शाह, रमेश राजोटे, अरुण रामेकर यांच्यासह बहुसंख्य काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: The Congress will be strengthened by bringing together grassroots activists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.