वरूडमध्ये काँग्रेसद्वारे विद्युत बिलाची होळी
By admin | Published: August 18, 2016 12:08 AM2016-08-18T00:08:43+5:302016-08-18T00:09:32+5:30
शहरासह तालुक्यातील विविध प्रलंबित मागण्यांकरिता तालुका काँग्रेस तसेच युवक काँग्रेसच्यावतीने....
रास्ता रोको आंदोलन : ३५ आंदोलकांना अटक
वरूड : शहरासह तालुक्यातील विविध प्रलंबित मागण्यांकरिता तालुका काँग्रेस तसेच युवक काँग्रेसच्यावतीने १६ आॅगस्टला पांढुर्णा चौक परिसरात युवानेते विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी विद्युत बिलाची होळी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी ३५ आंदोलकांना अटक करून गुन्हे दाखल केले आहेत.
तालुक्यासह शहरातील वीज ग्राहकांना जादा वीज बिल येत असल्याने विद्युत ग्राहकांची लूट होत आहे. वरुड शहरात मोकाट जनावरे रस्त्यावर बसत असल्याने अपघाताला आमंत्रण दिले जात आहे. वारंवार नगरपरिषदेला निवेदने देवूनही कारवाई झाली नाही. वरुड शहरातील नाल्या, रस्ते आदींच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. त्याची चौकशी व्हावी, गांधी पुतळयामागे असणारे भाजीवाले, फळवाले, किरकोळ दुकानदाराच्या दुकानाकरीता जागा उपलब्ध करून द्यावी, सावता चौकातील उचललेल्या दुकानदारांना जागा मिळण्याकरिता गोठाण ते नाथ मंदिर ते राममंदिर आणि शहीदस्मृती मंदिर रस्ता, शाकुंतल विहार, गोविंद विहार, विजयनगर, लक्ष्मीनगर, रेणुकानगर, ताजनगर, सूर्यानगर, आंडेवाडी, जयश्रीनगर आदी भागातील रस्त्यांची दुर्दशा दूर करणे, यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
यामध्ये तालुका काँग्रेस कमिटी, मोर्शी विधानसभा युवक युवक काँग्रेस, शहर युकाँ, अल्पसंख्यक शहर युकाँचे पदाधिकारी तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या आवारातून वर्धा लोकसभा युकाँचे अध्यक्ष विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला.
यावेळी धनंजय बोकडे, अजय नागमोते, अनिल गुल्हाने, प्रमोद टाकरखेडे, राहुल चौधरी, अनिल कडू, उमेश रडके, प्रमोद रडके, हरिश वरखेडकर, बंटी काझी, अजहर काझी, मो. निसार, हेमंत कोल्हे, विकास पांडे, अनिल आंडे, विजय चौधरी, स्वप्नील खांडेकर, राहुल नेरकर, अंकुश राऊत, नरेंद्र पावडे, वसंत निकम यांचा समावेश होता. मुख्याधिकारी प्रकाश राठोड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वीज बिलांची होळी करण्यात आली. ठाणेदार गोरख दिवे यांनी बंदोबस्त ठेवला. (तालुका प्रतिनिधी)