प्रलोभन देऊन मिळविली संमती; बालविवाहानंतर जबरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2022 05:00 AM2022-05-30T05:00:00+5:302022-05-30T05:01:03+5:30

पैशाचे आमिष देऊन अमोल सोळंके याने मुलीच्या नातेवाईकांची संमती मिळविली. त्या बालविवाहासाठी अल्पवयीन मुलीला अकोला जिल्हयातील एका गावात महिलेच्या घरी नेण्यात आले. तेथे अन्य पाच आरोपींनी त्या मुलीचा अमोल सोळंके सोबत जबरीने बालविवाह करून दिला. त्यानंतर तिला भातकुली तालुक्यातील एका गावी नेण्यात आले. तेथे ती अमोल सोळंके याच्या घरी एक ते दीड महिना राहिली. त्या कालावधीत आरोपी अमोल सोळंके याने त्या मुलीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. 

Consent obtained by temptation; Forced after child marriage! | प्रलोभन देऊन मिळविली संमती; बालविवाहानंतर जबरी!

प्रलोभन देऊन मिळविली संमती; बालविवाहानंतर जबरी!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अल्पवयीन मुलीच्या पालकांना पैशाचे प्रलोभन देऊन तिच्याशी लग्न केल्यानंतर तिचा लैंगिक छळ करण्यात आला. चार ते पाच महिन्यांपूर्वी अकोला जिल्ह्यातील एका गावात ही घटना घडली. याप्रकरणी वलगाव पोलिसांनी २८ मे रोजी रात्री १२.२३ वाजता एका महिलेच्या तक्रारीवरून चार पुरुष व दोन महिलांविरुद्ध भादंविचे कलम ३७६ (२), (एन), ३२३, ५०६, ३४, पोस्को व बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या कलम ९, १०, ११ अन्वये गुन्हा दाखल केला.  
तक्रारीनुसार,  एका अल्पवयीन मुलीवर हा प्रसंग उद्भवला.  तक्रारकर्ता महिलेच्या एका नातेवाईकास फोन करून मला तुमच्या नातेवाईक मुलीशी लग्न करायचे आहे, असे आरोपी अमोल सोळंके (३५, ता. भातकुली) याने कळविले. मात्र, त्या लग्नाला अल्पवयीन मुलीने नकार दिला. त्यावेळी पैशाचे आमिष देऊन अमोल सोळंके याने मुलीच्या नातेवाईकांची संमती मिळविली. त्या बालविवाहासाठी अल्पवयीन मुलीला अकोला जिल्हयातील एका गावात महिलेच्या घरी नेण्यात आले. तेथे अन्य पाच आरोपींनी त्या मुलीचा अमोल सोळंके सोबत जबरीने बालविवाह करून दिला. त्यानंतर तिला भातकुली तालुक्यातील एका गावी नेण्यात आले. तेथे ती अमोल सोळंके याच्या घरी एक ते दीड महिना राहिली. त्या कालावधीत आरोपी अमोल सोळंके याने त्या मुलीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. 

मारहाणीमुळे परतली तर म्हणाला जीव देतो
दारू पिऊन अमोलने त्या अल्पवयीन मुलीला मारहाण केली. कुठल्याही कारणावरून होत असलेल्या मारहाणीमुळे ती माहेरी परतली. त्यावर त्याने मोबाईल कॉल करून तू घरी परत ये, अन्यथा तेथे येऊन स्वत:च्या जिवाचे बरेवाईट करण्याची धमकी दिली. याप्रकरणी अखेर तिने २८ मे रोजी वलगाव पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी अमोल सोळंके (३५), अंबादास सोळंके (५७), गजानन चंपत पवार (४०), विजय चंपत पवार व एक महिला (सर्व रा. ता. भातकुली) यांच्यासह अकोला जिल्ह्यातील महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. बालविवाह प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीचाही समावेश आहे.

काय म्हणतो कायदा
'बालविवाह प्रतिबंध कायदा' हा महत्त्वाचा आणि मुलींना संरक्षण देणारा कायदा आहे. या कायद्याप्रमाणे १८ वर्षांहून लहान मुलगी व २१ वर्षांहून कमी वयाचा मुलगा कायदेशीर विवाहासाठी योग्य नाहीत. वर किंवा वधू यांच्यातील एक जरी अल्पवयीन असेल, तरी तो बालविवाह ठरतो. असा विवाह करणारी सज्ञान व्यक्ती, लग्न ठरवणारे, पार पाडणारे, हजर असलेले सर्व या कायद्यानुसार गुन्हेगार आहेत. ज्या बालक वा बालिकेचा विवाह झाला आहे; त्यांना तो मान्य नसल्यास न्यायालयात अर्ज करून रद्दबादल ठरवता येतो. बालवधूला पतीकडून किंवा तो अज्ञान असल्यास सासऱ्याकडून पोटगी मिळू शकते.

 

Web Title: Consent obtained by temptation; Forced after child marriage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न