पक्षी संवर्धनासाठी ‘तो’ झपाटलेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 11:37 PM2018-05-14T23:37:13+5:302018-05-14T23:37:13+5:30

शिक्षणावर त्याचा भर आहे; पक्षिसंवर्धन व्हावे, पर्यावरण अबाधित राहावे, यासाठी तो झपाटला आहे. हरित सेनेशी जुळलेल्या वडिलांच्या पाठबळामुळे त्याने आपल्या व्यासंगात इतरांना सहभागी करून निसर्गाशी जवळीक साधली आहे. शंतनु प्रभाकर पाटील असे या पक्षिप्रेमीचे नाव आहे.

For the conservation of the bird 'he' shaken | पक्षी संवर्धनासाठी ‘तो’ झपाटलेला

पक्षी संवर्धनासाठी ‘तो’ झपाटलेला

Next
ठळक मुद्देघरट्यांचे देतो प्रशिक्षण : वारली पेंटिंगने शासकीय भिंती सुशोभित

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शिक्षणावर त्याचा भर आहे; पक्षिसंवर्धन व्हावे, पर्यावरण अबाधित राहावे, यासाठी तो झपाटला आहे. हरित सेनेशी जुळलेल्या वडिलांच्या पाठबळामुळे त्याने आपल्या व्यासंगात इतरांना सहभागी करून निसर्गाशी जवळीक साधली आहे. शंतनु प्रभाकर पाटील असे या पक्षिप्रेमीचे नाव आहे.
सिद्धि विनायक कॉलनीतील प्रभाकर पाटील रामकृष्ण विद्यालयातून सेवानिवृत्त झाले. त्यापूर्वी शाळेत हरित सेनेचे ते मास्टर ट्रेनर होते. शंतनु हा त्यांचा मुलगा. तो काय करतो, तर पक्ष्यांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था करतो आणि इतरांनाही त्यासाठी उद्युक्त करतो. टाकाऊ वस्तूतून घरटी, बर्ड फीडर कसे तयार करायचे, याचे प्रात्यक्षिक तो चिमुकल्यांना देतो. दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता या विषयावरील कार्यशाळा सांस्कृतिक भवनमध्ये नुकतीच त्याने घेतली. हे कार्य त्याने सहा-सात वर्षांपासून हाती घेतले आहे. आतापर्यंत त्याने शेकडो विद्यार्थ्यांमध्ये पक्ष्यांबद्दल जागरूकता, प्रेम जागविले आहे. जागतिक चिमणी दिनानिमित्त त्याने तब्बल २०० गंगोली (मातीचे भांडे) विद्यार्थ्यांमध्ये वितरित केले.
आपल्या घराच्या आवारातही शंतनुने पाच कृत्रिम घरटी, सहा गंगोली टांगल्या आहेत. त्याने बांबूचीही घरटी बनविली आहेत. या घरट्यांच्या आश्रयाने सुमारे २५ पक्षी प्रजातीच्या कुटुबीयांनी वास्तव्य केले आहेत. सिव्हर बिल पक्ष्याने त्यामध्ये अंडी देऊन पिल्ले जन्माला घातली आहेत. चिमणी, ब्राह्मणी मैना, माडमुनिया, शिकरा, बोरी बुलबुल आदी पक्षी येथे दृष्टीस पडतात. त्याने शेजाऱ्यांनाही घरटी पुरविली आहेत.

Web Title: For the conservation of the bird 'he' shaken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.