मध्यप्रदेश, अमरावतीतून येते खेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 11:37 PM2018-09-21T23:37:18+5:302018-09-21T23:38:03+5:30
शहरातील युवक मोठ्या प्रमाणात दारू आणि गांजा या नशेच्या आहारी गेल्याचे चित्र असून, याची विक्री अतिक्रमित असलेल्या विशिष्ट पानटपरीवरून केली जाते. मध्यप्रदेशच्या बºहाणपूर, धारणी, बहिरम आणि बडनेरा, अमरावती मार्गे हा अवैध माल येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : शहरातील युवक मोठ्या प्रमाणात दारू आणि गांजा या नशेच्या आहारी गेल्याचे चित्र असून, याची विक्री अतिक्रमित असलेल्या विशिष्ट पानटपरीवरून केली जाते. मध्यप्रदेशच्या बºहाणपूर, धारणी, बहिरम आणि बडनेरा, अमरावती मार्गे हा अवैध माल येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
परतवाडा पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी शहरातील मुगलाईपुरा भागातून इम्रान खान हैदर खान (३०) या गांजातस्कराला अटक केली. त्याच्या जवळून २० किलो माल हस्तगत गेला. चार दिवसांपूर्वी अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी दिनेशसिंग रामसिंग बालोदिया व जया दिनेश बालोदिया (३८, रा. कविठा रोड कांडली) या पतीपत्नीला २० किलो गांजासह ताब्यात घेतले. त्यामुळे जुळ्या शहरांत मोठ्या प्रमाणात गांजाविक्री होत असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
परतवाडा, अचलपूर या जुळ्या शहरांतील युवकांमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात अवैध दारू आणि गांजा विक्री करण्यासह त्याचा नशा करण्याचे प्रमाण वाढले. त्यांचे विशिष्ट अड्डे असून, ठरावीक ग्राहकांच्या माध्यमातून विक्री केली जाते. परतवाडा, अचलपूर शहरांतील काही विशिष्ट जागांवर अतिक्रमण करून चहा आणि पानटपरीचा व्यवसाय, धाबे, हॉटेलमध्ये मध्य प्रदेशातील बनावट विदेशी दारू आणि गांजा विकला जातो. शिरजगाव पोलिसांनी गत आठवड्यात बहिरम जवळ नाकाबंदी करून परतवाडा येथील दोघांना मध्यप्रदेशाच्या विदेशी दारूसह पकडले होते. मात्र, त्यानंतर एक्ससाइज विभागाकडून अपेक्षित धाडसत्र राबविले गेले नाही.
हे आहेत शौकिनांचे ठिय्ये
परतवाडा शहरात गांजा विक्री आणि ओठाण्यासाठी (पिण्यासाठी) विशिष्ट ठिकाण शहरात आहेत. त्यामध्ये धारणी-चिखलदराकडे जाणारा वाय पॉइंट, परेड ग्राउंड, आठवडी बाजार, बाजार समितीमागचा भाग, हिंदू स्मशानभूमी, गळंकी रोड, इंग्रज बिल्डींग, चिखलदरा स्टॉप, रेस्ट हाऊस प्रांगण, तेथीलच एक कॉम्प्लेक्स, कविठा स्टॉप, गल्ली नं. ३ आदी ठिकाणी हमखास गांजा आणि अवैध दारू पिणारे तसेच विकणारे दिसून येतात. परतवाडा पोलिसांनीसुद्धा या जागांवर आता लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
धारणी, अमरावती मार्गे येतो शहरात
परतवाडा शहरात गांजा बऱ्हाणपूर, धारणी बैतुल, बहिरम, बडनेरा अमरावती मार्गे आंध्रप्रदेश, तेलंगणा येथून येत असल्याचे आरोपींनी पोलीस तपासात स्पष्ट केले. त्यामुळे पकडण्यात आलेल्या आतापर्यंतच्या गांजा व विदेशी दारू तस्करांचा म्होरक्या कोण? यात किती गँग चा समावेश आहे? कुणाच्या हातमिळणीने हे अवैध व्यवसाय फोफावले? आदी सर्व बाबी पोलिसांनी तपासण्याची गरज आहे. मोठ्या प्रमाणात युवक या नशेच्या आहारी गेल्यानेच त्यासाठी गरजेनुसार चोऱ्या, लुटमार, हाणामारी, हत्यासारखे प्रकार वाढले आहेत, हे विशेष
शहरातील गांजा व अवैध धंदे करणाºयांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यांच्या ठिकाणावर दिवसभर नजर ठेवली जात आहे. येण्याचे मार्ग, तस्करांची माहिती गोळा केली जात आहे.
- संजय सोळंके
ठाणेदार, परतवाडा