सततच्या पावसाने शेतात पाणी साचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:17 AM2021-06-16T04:17:47+5:302021-06-16T04:17:47+5:30

बॉटम पान २ फोटो पी १५ नांदगाव नांदगाव खंडेश्वर : सततच्या पावसाने बऱ्याच शेतात पाणी साचले. काही शेतांमध्ये दलदल ...

The constant rains flooded the fields | सततच्या पावसाने शेतात पाणी साचले

सततच्या पावसाने शेतात पाणी साचले

Next

बॉटम पान २

फोटो पी १५ नांदगाव

नांदगाव खंडेश्वर : सततच्या पावसाने बऱ्याच शेतात पाणी साचले. काही शेतांमध्ये दलदल निर्माण झाली. शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला असला तरी दररोज पडणाऱ्या पावसामुळे पेरणीची कामे खोळंबली आहेत. खोलगट भागातील शेतात पाणी साचल्यामुळे ट्रॅक्टरने पेरणी करणे शक्य नाही, असे रवी तेळे या शेतकऱ्याने सांगितले.

तालुक्यात १ जून ते १४ जूनपर्यंत आठ दिवस पावसाने हजेरी लावली. गतवर्षीच्या तुलनेत तालुक्यात ९७.२० टक्के पाऊस कोसळला. नांदगाव महसूल मंडळात ११९.५० मिमी, शिवणी रसुलापुर महसूल मंडळात १४३ मिमी, दाभा महसूल मंडळात १६० मिमी, मंगरूळ चवाळा महसूल मंडळात १९६.४० मिमी, पापळ महसूल मंडळात १४१.५० मिमी, लोणी महसूल मंडळात ११६.५० मिमी, धानोरा गुरव महसूल मंडळात १५७.३० मिमी व माहुली चोर महसूल मंडळात १२४.१० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पेरणीची घाई नको !

जोराचा पाऊस झाल्यानंतर बियाणे न उगवण्याचा, जमिनीत खोलवर जाण्याचा किंवा वाहून जाण्याचा धोका असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. १७ जूननंतर पेरणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

कोट

शेतकऱ्यांनी उगवणशक्ती तपासण्याबरोबरच पेरणी करताना बीजप्रक्रिया करावी. रासायनिक कार्बोझिन ३७.५ टक्के, थायरम ३७.५ टक्के तीन ग्रॅम प्रतिकिलो याची प्रक्रिया बियाणे पेरणीच्या एक दिवसाअगोदर व जैविक बीजप्रक्रिया रायझोबियम पी.एस.बी. किंवा ट्रायकोडर्मा सहा मिली पेरणीच्या दोन तास अगोदर करून पेरणी करावी.

- राहुल माने, तालुका कृषी अधिकारी, नांदगाव खंडेश्वर

===Photopath===

150621\img-20210615-wa0007.jpg

===Caption===

बऱ्याच शेतात खोलगट भागात पावसाचे पाणी साचले.

Web Title: The constant rains flooded the fields

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.