२५ कोटींच्या निधीतून होणार पेढी नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:13 AM2021-07-30T04:13:11+5:302021-07-30T04:13:11+5:30
अमरावती : वलगाव येथील पेढी नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम हे २५ कोटींच्या निधीतून करण्यात येणार आहे. त्याकरिता अर्थसंकल्प २०१९-२० ...
अमरावती : वलगाव येथील पेढी नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम हे २५ कोटींच्या निधीतून करण्यात येणार आहे. त्याकरिता अर्थसंकल्प २०१९-२० मध्ये सदर निधी मंजूर करण्यात आला होता. आता सदर पुलाच्या बांधकामाकरिता ई- निविदा प्रक्रिया राबविली जात असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
संत गाडगेबाबा यांचे महनिर्वाणभूमी असलेल्या वलगावच्या आताच्या जुन्या पुलाची ओळख असून, तो ऐतिहासिक पूल आहे. याच पुलावर गाडगेबाबांनी शेवटचा श्वास घेतला होता. सदर पूल अद्यापही चांगल्या स्थितीत आहे. गत वर्षी या पुलाची दुरुस्ती करण्यात आली. मात्र, भविष्यातील या मार्गावरील वाहतूक लक्षात घेता पालकमंत्री तथा महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी नवीन पुलाच्या बांधकामाचा प्रस्ताव टाकला होता. याला मंजुरी मिळाल्यानंतर अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर पुलाचा सर्वे करून जागा निश्चिती व पुलाचा सर्वे करून त्याची संकल्पचित्र तयार करण्यात आले. जुन्या पुलाला तेवढ्याच उंचीचा हा समान पूल होणार आहे. अमरावतीहून वलगावकडे जाताना डाव्या बाजूला पूल उभारण्यात येणार आहे. अडीशे मीटर पुलाची लांबी असणार आहे तर ११ मीटर रुंदीचा हा पूल बांधण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विनोद बोरसे यांनी दिली. हा पूल करीत असताना जुना पुल तसाच कायम राहणार असून, दोन्ही पुलावरून वाहने धावणार असल्याचे बांधकाम विभागाने स्पष्ट केले. ना. यशोमती ठाकूर यांनी यासाठी प्रयत्न केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सदर पुलाच्या निविदा प्रक्रियेला तसेच प्रत्यक्ष कामाला तीन ते चार महिन्याचा कालावधी लागणार असल्याची माहिती आहे.
कोट आहे.