जरुड येथे ऑक्सिजन पार्कची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:39 AM2020-12-17T04:39:06+5:302020-12-17T04:39:06+5:30
फोटो - जरूड पी १६ जरूड : स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने वसुंधरा अभियान राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत ऑक्सिजन पार्कची ...
फोटो - जरूड पी १६
जरूड : स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने वसुंधरा अभियान राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत ऑक्सिजन पार्कची निर्मिती करण्यात येत आहे. यानिमित्त जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र बहुरूपी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सरपंच सुधाकर मानकर, उपसरपंच शैलेश ठाकरे, प्रभारी गटविकास अधिकारी सुभाष बोपटे, ग्रामविकास अधिकारी अमोल गेडाम, तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष सोपान ढोले, डेबूजी महाराज पतसंस्थेचे अध्यक्ष रवींद्र सुरजुसे, पंचायत समितीचे लेखाधिकारी संजय खासबागे, दक्षता समिती अध्यक्ष संजय घोरपडे, प्राचार्य श्याम जाधव, प्रगतिशील शेतकरी भीमराव वाडोदे तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते . ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात साग, आपटा, कडुनिंब, पेरू, आंबा, आवळा, पिंपळ आदी वृक्षांची लागवड करण्यात आली. माझी वसुंधारा अभियान अंतर्गत ऑक्सिजन पार्कची निर्मिती तसेच सौरऊर्जेवर वीजनिर्मिती करून प्रदूषणमुक्त गाव साकारण्याचा संकल्प याप्रसंगी घेण्यात आला. यावेळी सरपंच सुधाकर मानकर यांनी उपस्थितांसह ग्रामस्थांना स्वच्छतेची शपथ दिली.