ग्राहकांना परवडेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:15 AM2021-08-26T04:15:44+5:302021-08-26T04:15:44+5:30
कोट भेंडीची २० किलोचे पोते २० रुपयात बाजारात मागितले जात आहे. याच्या तोडाईवरील खर्च त्यापेक्षा कितीतरी पट अधिक आहे. ...
कोट
भेंडीची २० किलोचे पोते २० रुपयात बाजारात मागितले जात आहे. याच्या तोडाईवरील खर्च त्यापेक्षा कितीतरी पट अधिक आहे. त्यामुळे भेंडीतून उत्पादन खर्चही हाती लागत नाही. हिरवी मिरची १५ रुपये किलोने मागितले जात आहे. १५ किलो मिरची तोडायला दोनशे रुपये खर्च येतो. काटा हमाली आणि कमिशन हे वेगळेच. त्यामुळे भाजीपाला उत्पादकांची आर्थिक स्थिती दयनीय झाली आहे.
- सुनील कडू, जवळापूर, शेतकरी
* ग्राहकांना परवडेना
कोट
शेतकऱ्यांकडून अत्यल्प दरात भाजीपाला खरेदी करणाऱ्या विक्रेत्यांनी ग्राहकांना माफक दरात भाजीपाला उपलब्ध करून देणे अपेक्षित असताना तसे होत नाही. २० रुपये पावाप्रमाणे कोथिंबीर घ्यावी लागत आहे. ४० रुपये किलोच्याखाली कुठलीही भाजी ग्राहकांना मिळत नाही. त्यामुळे या महागड्या भाज्या हातमजुरी करणाऱ्या ग्राहकांना परवडणाऱ्या नाहीत.
- संजय वानखडे, ग्राहक, कांडली
कोट:-
बाजारात कडाडलेले भाज्यांचे भाव ग्राहकांना परवडणारे नाहीत. बटाटा वगळता कुठलाही भाजीपाला २० रुपये किलोत ग्राहकांना मिळत नाही. बाजारात कांदा ३० ते ४० रुपये किलोच्या खाली नाही. हिरवा भाजीपाला ग्राहकांना ४० ते ६० रुपये किलोप्रमाणे विकत घ्यावा लागत आहे. सामान्य ग्राहकांच्या हा भाजीपाला आवाक्याबाहेरआहे.
- विनोद इंगोले, परतवाडा ग्राहक
* भावात एवढा फरक का?
कोट
मंडईत भाजीपाल्याची आवक वाढली आहे. त्या प्रमाणात व्यापारी नाही. अंगावर दिलेल्या भाजीपाल्याची वेळेत वसुली नाही. एक किंवा दीड दिवसानंतर शिळा भाजीपाला कुणी घेत नाही. तो टाकून द्यावा लागतो. यातच बाहेरून भाजीपाला येत आहे. दरम्यान पावसामुळे भाजीपाल्याची गुणवत्ताही कमी अधिक होते. परिणामी शेतकरी ते ग्राहक यात भावात फरक दिसून येतो.
- दीपक चंदेल, अचलपूर व्यापारी