हिवराच्या शेंगा खाल्याने दहा बकऱ्या दगावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 10:30 PM2019-03-15T22:30:43+5:302019-03-15T22:31:16+5:30

हिवर वृक्षाच्या शेंगा खाल्ल्याने दहा बकऱ्या दगावल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास भानखेडा रोडवर घडली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला.

With the consumption of pomegranate, 10 goats are dugane | हिवराच्या शेंगा खाल्याने दहा बकऱ्या दगावल्या

हिवराच्या शेंगा खाल्याने दहा बकऱ्या दगावल्या

Next
ठळक मुद्देभानखेडा रोडवरील घटना : वनकर्मचाऱ्यांना पाचारण

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : हिवर वृक्षाच्या शेंगा खाल्ल्याने दहा बकऱ्या दगावल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास भानखेडा रोडवर घडली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला.
बेनोडा परिसरातील रहिवासी युवराज नामदेव सयाम यांचा शेळीपालनाचा व्यवसाय आहे. शुक्रवारी सकाळी छत्री तलावाजवळील भानखेडा रोडवर ते दहा बकऱ्या चराईसाठी घेऊन गेले. यादरम्यान युवराजने जंगललगत परिसरात असणाºया हिवराच्या फांद्या तोडून बकऱ्यांना खाण्यास दिल्या. बकºयांनी पाल्यासोबत शेंगाही खाल्या. काही वेळातच आठ बकºया जमिनीवर कोसळल्या. हा प्रकार पाहून युवराज सयाम यांनी घटनेची माहिती वन्यप्रेमींसह वनविभागाला दिली. काही वेळात वनकर्मचारी व वन्यप्रेमींनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
युवराज सयाम यांनी जिवंत असलेल्या दोन बकऱ्यांना तात्काळ पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले. तेथे त्या दोन्ही बकऱ्यांचीही मृत्यू झाला. बकºयांच्या मृत्यूमुळे युवराज सयाम यांचे पन्नास हजारांचे नुकसान झाले. हिवराच्या शेंग्या खाल्ल्याने बकऱ्या दगावल्याची ही पहिलीच घटना पुढे आली आहे.


बकºयांचा हिवराच्या शेंगा खाल्ल्याने मृत्यू झाला. हा प्रकार पहिल्यांदाच घडला. हिवराचे एखादे वृक्ष विषारी असण्याची शक्यता आहे.
- युवराज सयाम
बकरी पालन व्यावसायिक

Web Title: With the consumption of pomegranate, 10 goats are dugane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.