काऊंटडाऊन सुरू

By admin | Published: October 9, 2014 10:54 PM2014-10-09T22:54:49+5:302014-10-09T22:54:49+5:30

विधानसभा निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू झाले असून प्रचारतोफा सोमवार १३ आॅक्टोबर रोजी थंडावणार आहे. सध्या सर्वच मतदारसंघांतील प्रचार शिगेला पोहोचल्याने लढतीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे.

Continue to countdown | काऊंटडाऊन सुरू

काऊंटडाऊन सुरू

Next

सोमवारी थंडावणार प्रचार तोफा : उमेदवारांची दमछाक
गजानन मोहोड - अमरावती
विधानसभा निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू झाले असून प्रचारतोफा सोमवार १३ आॅक्टोबर रोजी थंडावणार आहे. सध्या सर्वच मतदारसंघांतील प्रचार शिगेला पोहोचल्याने लढतीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे.
महायुती व आघाडी नामांकन अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापूर्वी तासाभरात तुटली. स्वबळावर लढण्यासाठी ‘इलेक्टीव्ह मेरिट’ असलेल्या उमेदवारांची शोधाशोध झाली. अन्य इच्छुकांचे उमेदवारी अर्ज घेण्यासाठी तीन दिवस मनधरणी करण्यात गेले. त्यानंतरही शिल्लक राहिलेली नाराजी दसऱ्याला सोने देऊन दूर करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर १ आॅक्टोबरला उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. सर्वच राजकीय पक्षांद्वारे प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. प्रचाराला अल्प कालावधी मिळाल्यामुळे प्रत्येक उमेदवार प्राणपणाने प्रचाराला लागला. त्यामुळे जिल्ह्यात सध्या प्रचाराची धूळवड जाणवत आहे. सोमवार १३ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रचारतोफा थंडावल्यानंतर ही धूळवड शांत होईल.
१ आॅक्टोबरला दुपारी ३ वाजतानंतर प्रत्येक मतदारसंघातील विधानसभा निवडणूक लढतीचे चित्र स्पष्ट झाले. त्यानंतर प्रचार कार्यालयाचे उद्घाटन, प्रचाराचा मुहूर्त करून सर्व राजकीय व अपक्ष उमेदवारांनी प्रचाराला सुरूवात केली. युती-आघाडी तुटल्यानंतर अनेक उमेदवारांनी नव्या पक्षांमध्ये घरठाव केला. परिणामी इच्छुक उमेदवार व पदाधिकारी नाराज झालेत. त्यांनी ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ ही भूमिका घेतली. त्यांची मनधरणी करून त्यांना प्रचाराच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या प्रयत्नांमध्ये पुन्हा २ ते ३ दिवस खर्ची पडले. मतदान १५ आॅक्टोबरला होणार आहे. त्यामुळे दोन दिवसपूर्व १३ आॅक्टोबरला प्रचार बंद होईल. गुरूवारनंतर प्रचाराला केवळ ४ दिवस उरले आहेत. एवढ्या कमी अवधीत ‘हाऊस टू हाऊस’ प्रचार करणे उमेदवारांना शक्य नसल्याने अख्खे कुटुंब प्रचारात उतरल्याचे प्रथमच पहायला मिळाले आहे.

Web Title: Continue to countdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.