शहरांमध्ये नियमित स्प्रेईंग, फॉगिंग, सफाईकामात सातत्य ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 05:00 AM2021-07-31T05:00:00+5:302021-07-31T05:01:02+5:30

नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी यापूर्वीच खबरदारी घेणे आवश्यक होते. सार्वजनिक आरोग्य राखण्याच्या दृष्टीतून शहरातून नियमित स्प्रेईंग-फॉगिंग, सफाईकामात सातत्य ठेवावे. स्वच्छता व आरोग्य सुरक्षिततेच्या कामात कुचराई कराल, तर कठोर कारवाई करू, असा इशारा राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री  यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी येथे दिले.

Continue regular spraying, fogging, cleaning in cities | शहरांमध्ये नियमित स्प्रेईंग, फॉगिंग, सफाईकामात सातत्य ठेवा

शहरांमध्ये नियमित स्प्रेईंग, फॉगिंग, सफाईकामात सातत्य ठेवा

googlenewsNext
ठळक मुद्देकामात कुचराई केल्यास कठोर कारवाई, पालकमंत्र्यांकडून आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामात सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आजार वाढत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी यापूर्वीच खबरदारी घेणे आवश्यक होते. सार्वजनिक आरोग्य राखण्याच्या दृष्टीतून शहरातून नियमित स्प्रेईंग-फॉगिंग, सफाईकामात सातत्य ठेवावे. स्वच्छता व आरोग्य सुरक्षिततेच्या कामात कुचराई कराल, तर कठोर कारवाई करू, असा इशारा राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री  यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी येथे दिले.
 पावसाळी साथरोग प्रतिबंधक उपाययोजना व सार्वजनिक स्वच्छतेबाबत आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी पवनीत कौर, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, नगर परिषद प्रशासन अधिकारी गीता वंजारी, माजी महापौर विलास इंगोले, विरोधी पक्षनेता बबलू शेखावत तसेच नगरपालिका, पंचायतींचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.
तिवसा, चिखलदरा, धारणी व इतर शहरांमध्येदेखील अस्वच्छतेमुळे आजार वाढत असल्याबाबत तक्रारी येत आहेत. शहरातील सर्वच परिसरात स्वच्छतेची कामे काटेकोर राबवावीत. झोपडपट्टी वसाहतीत नियमित स्वच्छता होत नसल्याचीही तक्रार आहे. नागरिकांच्या आरोग्याचा हा प्रश्न आहे. त्यामुळे सफाईची कामे तात्काळ राबवावीत. यानंतर याबाबत एकही तक्रार येता कामा नये. तसे घडल्यास जबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पालकमंत्र्यांनी दिला. 
नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध कामांसाठी प्राप्त होणारा निधी अखर्चित राहता कामा नये. प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेच्या प्रक्रिया तत्काळ पूर्ण करून घ्याव्यात. अनेकदा निधी येऊनही कामे सुरू होत नाहीत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. विकासकामांबाबत हयगय खपवून घेतली जाणार नाही. त्यामुळे तात्काळ कामांमध्ये गती व सुधारणी करावी. विविध कामांचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने आपण स्वत: नगरपालिका, नगरपंचायतींच्या कामांची पाहणी करू, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

 

Web Title: Continue regular spraying, fogging, cleaning in cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.