उदखेड-तरोडा पांदण रस्त सुरू ठेवा, अन्यथा रेल रोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:14 AM2021-09-11T04:14:28+5:302021-09-11T04:14:28+5:30
मोर्शी तालुक्यातील ऊदखेड येथील पंधराशे ते दोन हजार शेतकऱ्यांचा पांदण रस्ता फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. परंतु तेथून अमरावती ...
मोर्शी तालुक्यातील ऊदखेड येथील पंधराशे ते दोन हजार शेतकऱ्यांचा पांदण रस्ता फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. परंतु तेथून अमरावती नरखेड रेल्वे लाईन गेल्याने तो बंद करण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांचा संत्रा, मोसंबी परदेशात नेण्यासाठी व कापूस, तूर आदी कडधान्य आणणताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हा पांदण रस्ता बंद न करता रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वे पूल बनविण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांच्यावतीने करण्यात आली. याबाबत ग्रामपंचायत ऊदखेड येथे ठराव मंजूर करून सन २०११ पासून रेल्वे खाते व या विभागाचे खासदार यांच्याकडे सतत पाठपुरावा करूनसुद्धा शासन व प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप संबंधित शेतकरी ग्रामस्थांचा आहे. रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वे फाटक अथवा रेल्वे पूल बनवून शेतकऱ्यांसाठी हा पांदम रस्ता त्वरित मोकळा करावा, अन्यथा रेल रोको आंदोलनाचा इशारा मोहन अढाऊ, किशोर पाटील, लीलाधर पारवे, दादाराव पारवे, अंकुश पोहकर, राजू पोहकर, भय्यासाहेब पोहकर, संतोष पारवे, राजूभाऊ मेश्राम, विनायकराव जवंजाळ, भागवतराव भोंडे, भीमराव सरदार, शुभम मसलाने, प्रवीण चौधरी, तुळशीदास सोळंके, किशोर पोहोकार, गोपाल पोहोकार, दिलीप उतखेडे, चेतन उतखेडे, विनोद लुंगे, विलास लुंगे, भास्कर लुंगे, रमेशराव धावट, अशोक धावट आदी शेकडो शेतकऱ्यांनी दिला आहे.