आरटीई प्रवेशासाठी आॅफ लाईन प्रस्ताव तयारी सुरू
By admin | Published: November 27, 2015 12:26 AM2015-11-27T00:26:49+5:302015-11-27T00:26:49+5:30
आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्याचे आॅफ लाईन अर्ज घेऊन त्यांना प्रवेश देण्याचा बाबतचा ठराव ...
अमरावती : आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्याचे आॅफ लाईन अर्ज घेऊन त्यांना प्रवेश देण्याचा बाबतचा ठराव २४ नोव्हेंबर रोजी जिल्हापरिषद शिक्षण समितीच्या सभेत घेण्यात आला आहे. सदर ठराव हा राज्याच्या शिक्षण विभागाकडे पाठविण्यासाठी शिक्षण विभागाने प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागा अंतर्गत जिल्ह्यातील जवळपास अडीच हजावर विद्यार्थी हे साधारणपणे आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी पात्र होते. मात्र यापैकी सुमारे ७०० विद्यार्थ्यानाच २५ टक्यात प्रवेश मिळाला परंतु बरेच मुली या प्रवेशापासून अद्यापही वंचित आहेत. या योजने अंतर्गत विद्यार्थ्याची सुमारे १४ हजार रूपयाचे शुल्क हे शासना मार्फत भरले जाते . मात्र सर्वच विद्यार्थ्याना आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे याचा फटका जिल्हा परिषद शाळेच्या पटसंख्येवर होत असल्याने या विद्यार्थ्याचे आॅफ लाईन अर्ज घेऊन वंचित विद्यार्थ्याना २५ टक्यातून प्रवेश देता यावा असा ठराव शिक्षण समितीत सभापती गिरीश कराळे यांनी मांडला हा ठराव सर्वानुमते मंजूर केला आहे.त्यामुळे आता हा प्रस्ताव राज्याच्या शिक्षण विभागाकडे पाठविला जाणार आहे.यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागा अंतर्गत आरटीऊ प्रवेशासाठी आॅफलाईन प्रवेशा बाबतचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी एस.एम. पानझाडे यांच्या मागदर्शनात तयार करण्याची प्रक्रीया शिक्षण विभागाने सुरू केली आहे. हा प्रस्ताव तयार होताच राज्याच्या शिक्षण विभागाला सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांचा निर्णय होईल. (प्रतिनिधी)